spot_img
अहमदनगरविनापरवाना फलक लावणाऱ्यांना आयुक्त यशवंत डांगे यांचा इशारा; 'आता...'

विनापरवाना फलक लावणाऱ्यांना आयुक्त यशवंत डांगे यांचा इशारा; ‘आता…’

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. काही महिन्यांपूव महानगरपालिका प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते. दंडही वसूल करण्यात आला होता. आता पुन्हा फलक हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, गुन्हेही दाखल करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

अनधिकृत फ्लेक्स बोर्ड संदर्भात कारवाईसाठी न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनामार्फत सातत्याने आढावा घेऊन अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक अशा ठिकाणी काही संस्था, नागरिक, व्यावसायिक आस्थापना, राजकीय कार्यकर्ते महानगरपालिकेची परवानगी न घेता फ्लेक्स बोर्ड लावत आहेत. महानगरपालिकेने अशा अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू केली आहे.

मंगळवारी सुमारे 40 पेक्षा अधिक फलक कारवाई करून हटवण्यात आले आहेत. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे.तसेच, महानगरपालिका क्षेत्रात फलक लावण्यासाठी नागरिक, संस्था, व्यवसायिक आस्थापना, राजकीय कार्यकर्त्यांनी रीतसर अर्ज करून व शुल्क भरून परवानगी घ्यावी. शहरात विनापरवाना फलक आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नाद करती का यावं लागतं…; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण, सेल्फी घेण्याच्या बहाण्याने आले अन्….

धाराशिव / नगर सह्याद्री : धाराशिव जिल्ह्यातील कायम प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या रील स्टार हॉटेल भाग्यश्रीच्या...

एसपी साहेब,‘सिस्पे’ला ७०० पोलिसांचे संरक्षण!

शिर्डीतील ‘ग्रो मोअर’पेक्षा ५० पट घोटाळा | पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचार्‍यांची सर्वाधिक गुंतवणूक सारीपाट...

Rain Alert : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला ऑरेंज अलर्ट, कोकणात अतिवृष्टी…

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असताना...

एलसीबीच्या पीआयपदी किरणकुमार कबाडी; दिनेश आहेर…

दिनेश आहेर नियंत्रण कक्षात | एसपी सोमनाथ घार्गे यांचे आदेश अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर स्थानिक...