spot_img
महाराष्ट्रआयुक्त यशवंत डांगे यांचे ठेकेदाराला आदेश; 'ते' काम 31 मे पूर्वी पूर्ण...

आयुक्त यशवंत डांगे यांचे ठेकेदाराला आदेश; ‘ते’ काम 31 मे पूर्वी पूर्ण करा

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरात माळीवाडा ते माणिक चौक ते भिंगारवाला चौक, तसेच अमरधाम ते आनंदी बाजार ते जिल्हा वाचनालय या रस्त्यांची काँक्रीटीकरणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. तत्पूव या ठिकाणी ड्रेनेज लाईन व पावसाळी गटारांची कामे सध्या सुरू आहेत. पावसाळा तोंडावर असल्याने येत्या 15 दिवसात ही कामे पूर्ण करावी, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ठेकेदार संस्थेला दिले आहेत. दरम्यान, या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, 31 मे पर्यंत ही कामे पूर्ण होतील, तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सोमवारी शहरातील रस्ते व पावसाळी गटारीच्या कामांचा आढावा घेतला. विशेषतः जिल्हा वाचनालय ते आनंदी बाजार ते नालेगाव अमरधामपर्यंत सुरू असलेली पावसाळी गटार व माणिक चौक परिसरातील गटारीच्या कामाची त्यांनी समक्ष पाहणी केली. रस्त्यावर खोदाई करून चेंबर बांधले जात आहेत. त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. या पावसाळी गटारीमुळे शहरातील रस्त्यांवरून वाहणारे पाणी व रस्त्यावर चौकात असणाऱ्य पाण्याचा तत्काळ निचरा होण्यास मदत होणार आहे. मागील दोन दिवसात झालेल्या पावसामध्ये काही ठिकाणी पूर्ण झालेल्या गटारीमुळे दहा ते पंधरा मिनिटात तेथे साचलेल्या पाण्याचा निचरा झाला आहे. या कामानंतर या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

सध्या अवकाळी पाऊस सुरू असून येत्या पंधरा दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सुरू असलेल्या कामांना गती द्यावी. 15 दिवसात म्हणजे 31 मे पूव पावसाळी गटारीची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ठेकेदार संस्थेला दिले आहेत. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला, तसेच या कामावर नियुक्त असलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनीलाही कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत. या कामांमुळे मध्य शहरातील नागरिकांना, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र लवकरच हे काम पूर्ण होईल. शहरातील रस्ते व पावसाळी गटारी याची समस्या कायमस्वरूपी माग लावण्यासाठी ही कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २६ गोवंशीय जनावरांची सुटका

कर्जत। नगर सह्याद्री राशीन (ता. कर्जत) येथील आळसुंदा येथे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवलेली...

राजकीय भूकंप होणार! राजीनाम्यानंतर जयंत पाटील यांना ‘या’ पक्षाची ‘मोठी’ ऑफर?

मुंबई। नगर सहयाद्री महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)...

शनि शिंगणापूर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल! फसवणुकीचा जुगाड पडला महागात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची पूजा, अभिषेक व तेल अर्पण केला जाईल...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांना खुशखबर मिळण्याचे संकेत..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल....