spot_img
अहमदनगरआयुक्त साहेब, धमक्यांची चमकोगिरी नको!; अल्टिमेटम कसला देता? हातात हातोडा घ्या अन्...

आयुक्त साहेब, धमक्यांची चमकोगिरी नको!; अल्टिमेटम कसला देता? हातात हातोडा घ्या अन्…

spot_img

सारिपाट | शिवाजी शिर्के

नेहमीची येतो पावसाळा या युक्तीप्रमाणे अतिक्रमण हटाव मोहिमेचे झाले आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी दोन दिवसात अतिक्रमणे काढून घेण्याचा अल्टीमेटम दिल्याचे समजले! खरे तर, आयुक्त साहेब हे नगर शहर आहे आणि येथील नागरिकांच्या मानसिकतेबाबत तुमची पीएडी झालीय! कारवाई करायचीच असेल तर मग अल्टीमेटम कशाला हेच समजत नाही. तुम्ही धडाकेबाज आहातच ना! मग, ही धमक्यांच्या चमकोगिरी कशासाठी? हातात हातोडा घ्या, जेसीबी सोबत घ्या आणि अतिक्रमणांच्या विरोधात मोहीम राबवा! फक्त ही मोहीम तोंडदेखली नको! शहरातील सर्वच रस्त्यांना मोकळा श्वास हवाय! पथारीवाले आणि टपर्‍यावाल्यांच्या मालकीचे रस्ते झाले आहेत. त्यांची दादागिरी आणि गुंडगिरी पहायाची आणि अनुभवायची असेल तर कापडबाजारातील मोची गल्लीत आयुक्तांनी फेरफटका मारावा! बोगस संघटना आणि बोगस पदाधिकार्‍यांसह त्यांची पाठराखण करणारे काही महाभाग यांना आयुक्तांनी आधी पोलिस ठाण्यात डांबले पाहिजे! आयुक्त साहेब, तुम्ही आता दोन दिवसांचा अल्टिमेटम दिलाच आहे तर सोमवारपासून ही मोहीम व्यापकपणे राबवा! त्याआड येणारा कोणी कितीही मोठा असला तरी त्याला देखील दाखवा कायदा आणि नियम!

नगर शहरातील अतिक्रमणांचा मुद्दा कायम कळीचा आणि राजकारण्यांच्या पुळक्याचा ठरत आला आहे. मात्र, या अतिक्रमणांचा मोठा त्रास नगरकरांना होतो. विशेषत: रस्त्याच्या बाजूला दुकाने थाटून सामान्य जनतेला त्रास देणार्‍या, त्यांना धमकावणार्‍या काही दुकानदार, टपर्‍यावाल्यांचे पंटर अनेकदा गंभीर मारहाणीपर्यंत गेले! मात्र, त्याची कोणतीही दखल पोलिस घेत नाहीत. आता आयुक्तांनी या विरोधात मोहिम हाती घेण्याची घेतलेली भूमिका यामुळेच नगरकरांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. मात्र, ही मोहीम प्रत्यक्ष हाती घेतली जाईल किंवा कसे याबाबत साशंकता आहे. आयुक्त यशवंत डांगे हे कर्तबगार आहेत आणि एकदा एखादी गोष्ट त्यांनी ठरवली की ते ती पूर्णत्वास नेतात ही त्यांची खासीयत आहे.

महापालिका आयुक्तांनी कठोर भूमिका घेत अतिक्रमणधारकांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देत अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारपासून शहराच्या सर्व भागात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेषत: दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा ते चितळे रोड, नेता सुभाष चौक, कापड बाजार, मोची गल्ली, बालिकाश्रम रोड, उपनगरातील एकवीरा चौक प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक, सक्कर चौक, मार्केट यार्ड परिसर, बोल्हेगाव, केडगाव, लिंक रोड, अंबिका नगर बस स्टॉप, कोठला स्टॅण्ड परिसर, झेंडीगेट, मुकुंदनगर, अकबर नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत आढळून आले.

आयुक्त साहेब, आपण जाहीर केल्यानुसार सोमवारपासून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होणार आहे. ज्यांची अतिक्रमणे आहेत, त्यांनी ती दोन दिवसांत काढून घ्यावीत, अन्यथा मनपा कठोर कारवाई करेल, असा इशारा तुम्ही दिलाय! शहर अतिक्रमण मुक्त करत मोकळा श्वास घेणारे शहर ही शहराची नवी ओळख निर्माण करण्याचा मानस तुम्ही व्यक्त केलाय याबद्दल तुमचे खास अभिनंदन!

आयुक्त साहेब, नगरकरांना कायम दुसर्‍याच्या काठीने साप मारण्याची सवय असल्याचे एव्हाना तुम्ही ओळखून असाचल! आता देखील तुमचीच काठी वापरली जाणार आहे. महापालिकेत सर्वस्वी तुम्हीच आहात हेही बरे झाले. आमदार संग्राम जगताप यांनी अतिक्रमणांच्या मुद्यावर कोणालाही पाठीशी न घालण्याची भूमिका यापूर्वीच घेतली आहे. त्यामुळे ही मोहीम आता व्यापकपणे हातात घेण्याची गरज आहे. तुमच्या या कार्याला नगरकर कधीच विसरणार नाहीत!

सिव्हीलसमोरील गवळीवाड्यातील जनावरांची मोठी समस्या!
जिल्हा रुग्णालयासमोरील गवळीवाडा येथे जनावरे रस्त्यावर सोडली जातात व रस्त्यावर बांधली जातात. या जनावरांचा रहदारीसह वाहन चालकांना मोठा त्रास होतो. त्या जनावरांसह त्यांच्या मालकांना वाहन चालकांनी हटकले तरी त्यांच्याकडून हातातील मोठ्या दांडक्याचा प्रसाद दिला जातो. विशषेत: याच रस्त्यावर अनेकदा त्यांचे धार्मिक कार्यक्रम आणि जवणावळीच्या पंक्ती देखील होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असल्याने आता ते याबाबत काय निर्णय घेतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

कापडबाजारसह सर्वच व्यापारी, दुकानदारांचे लागले लक्ष!
कापडबाजारातील मुख्य दुकानदारांच्या दारात काही फेरीवाले आणि दुकानदार बसतात. त्यांच्या मालकीचाच रस्ता आणि त्यांचीच जागा असल्याच्या अर्विभावात ते असतात आणि आडकाठी आणली त्याला लाठ्घाकाठ्यांचा प्रसाद! अशा अपप्रवृत्ती खरे तर ठेचून काढण्याची गरज आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर अतिक्रमण करून फूटपाथच गिळंकृत करुन टाकले आहेत. काही ठिकाणी तर थेट फूटपाथ सोडून रस्त्यांवर टपर्‍या थाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले असून, वाहतूक कोंडी होत आहे, तसेच पादचार्‍यांना वाहनांच्या वर्दळीतून वाट काढत जावे लागते. रस्त्याला लगत असणारी अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे होणार असल्याने या मोहीमेकडे आता व्यापार्‍यांसह सार्‍यांचेच लक्ष लागून असणे स्वाभाविक आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....