spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! कार्यालयातच आयुक्तांना अरेरावी, राष्ट्रवादीचा कडक इशारा

धक्कादायक! कार्यालयातच आयुक्तांना अरेरावी, राष्ट्रवादीचा कडक इशारा

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने घटनेचा निषेध | धडा शिकवण्याचा दिला इशारा
अहिल्यानगर । नगर सहयाद्री
महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्तांना कार्यालयामध्ये काही लोकांनी अरेरावी करत धिंगाणा घालण्याचे काम केले आहे. ही घटना निषेधार्थ असून भविष्यात कोणी अशा प्रकारचे वर्तन केल्यास त्याला धडा शिकवला जाईल. तसेच हिंदुत्ववादी संघटना अशा लोकांना धडा शिकवण्याचे काम करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी व्यक्त केली.

अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासन यशवंत डांगे यांना काही लोकांनी अरेरावी व धिंगाणा घातल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिकेत आयुक्तांची भेट घेऊन तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून अनधिकृत कत्तलखाने पाडल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, दीपक खेडकर, भाऊ बारस्कर, गणेश बोरुडे, सतीश ढवण आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र अशा पद्धतीने हातवारे करणे धिंगाणा घालणे हे चुकीचे आहे. तरी सर्वांनी तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. अनधिकृत कत्तलखाने महापालिका प्रशासक यशवंत डांगे यांनी पाडले. या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन यापूव अशी कारवाई कधीही झाली नव्हती असे ते म्हणाले.

माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून शहरांमध्ये शहरी विकासाची कामे सुरू आहे. रस्ता काँक्रिटीकरणाचे कामे करीत असताना यामध्ये थडगे अथवा धार्मिक स्थळे येत असून त्याची अतिक्रमणे तातडीने काढावीत व वाहतुकीचा प्रश्न माग लावावा असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जैन मंदिर: काळे यांचे पुण्यात धरणे आंदोलन; ताबा न सोडल्यास प्राणांतिक उपोषण करणार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर) ट्रस्टचा...

बदनामी केली..; किरण काळे यांच्यावर कारवाई करा; पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना कोणी दिले निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या...

आघाडी, युतीचे चित्र धुसर…; स्थानिक आघाड्यांना प्राधान्य

नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी राजकारण तापले | वरिष्ठांकडून आदेश मिळेना अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगर...

बोगस दस्त नोंदवून फसवणूक प्रकरण; अंजुम शेख, डावखर, इंगळेंसह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर | नगर सह्याद्री वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक...