spot_img
अहमदनगर...'या' मार्गाला आ. तांबेंचा विरोध'; केली मोठी घोषणा, प्रकरण काय?

…’या’ मार्गाला आ. तांबेंचा विरोध’; केली मोठी घोषणा, प्रकरण काय?

spot_img

पुणे | नगर सह्याद्री:
महिन्याभरापूव रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे रेल्वे स्थानकाला भेट दिली होती. पुणे नाशिक जुन्या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गावर जुन्नर तालुक्यातील खोडद गावात असलेले जीएमआरटी सेंटर अडथळा ठरत होते. मात्र, या सेंटरला कोणताही धक्का न लावता या मार्गात बदल करून पुणे-अहिल्यानगर-शिर्डी -नाशिक असा मार्ग करणार असल्याचे वैष्णव यांनी जाहीर केले.

त्यानुसार या नवीन मार्गासाठीचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असून त्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, त्यापूवच विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी यावर आक्षेप घेत राजकीय हेतूपोटी हा मार्ग बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच सर्वपक्षीय लढा उभारण्यात येणार असल्याचे देखील तांबे यांनी स्पष्ट केले आहे.

या नवीन मार्गामुळे सुमारे 80 किलोमीटर अंतर वाढणार असल्याने प्रवासाचा कालावधी दीड तासांनी वाढेल. हा प्रकल्प सरळमार्गे न केल्यास सेमी हायस्पीड हा मूळ उद्देशच फोल ठरत असल्याचे तांबे म्हणाले, नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर-चाकण-पुणे हा सरळ मार्ग सोडून अहिल्यानगर-शिडमार्गे नाशिक या मार्गे रेल्वे नेण्याचा घाट घातला जाणे दुर्दैवी आहे. पुणे-नाशिक-मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी सरळ मार्गानेच रेल्वे जाणे गरजेचे असल्याचे मत तांबे यांनी व्यक्त केले.
रेल्वे प्रकल्पाला विरोध नाही

पुणे- नाशिक – मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच होणे गरजेचे आहे. जीएमआरटीमुळे निर्माण होणारी अडचण बोगदा किंवा इतर पर्यायाने सोडवता येणे शक्य आहे. पुणे – नाशिक महामार्गावरील वाढते औद्योगीकरण व शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. पुणे – अहिल्यानगर सेमी हायस्पीड रेल्वेला विरोध नाही, मात्र ती पुणे – नाशिक मार्गाला पर्याय असू शकत नाही, असे देखील तांबे यांनी सांगितले आहे.

देशातील पहिली पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्प असून अत्यंत कमी वेळात पुणे-नाशिक अंतर पार करणे, हे या प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ठ आहे. तरच पुणे-नाशिक हा प्रवास 4 तासांचा होईल, अन्यथा हा प्रकल्प पुणे-नगर-शिड मार्गे नाशिक असा झाल्यास तीड तासांचे अंतर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...