अहमदनगर। नगर सहयाद्री
22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करणार आहे.त्या पाश्ववभूमीवर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे.
अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त दिल्लीगेट येथे लागलेल्या ५१ फुटी प्रभू श्रीराम यांच्या कट आऊटची शहरात चर्चा रंगली आहे. तर दिल्लीगेट परिसरातच अयोध्या श्री राम मंदिराच्या भव्य दिव्य प्रतिकृतीने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अयोध्या सोहळ्यासाठी नगरकर सज्ज झाले असून प्रसिद्ध श्री विशाल गणेश मंदिर येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.