spot_img
अहमदनगरआ. थोरात यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार प्रदान

आ. थोरात यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार प्रदान

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्राच्या कृषी, साहित्य, सहकार, समाजकारण, शिक्षण या सर्व क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देताना राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती भूषविताना या सर्व खात्यांना लोकाभिमुख करणारे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मुंबई विधानभवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने २०१८-१९ चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आमदार थोरात यांना राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

१९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार थोरात यांनी सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला आहे. ४० वर्षांच्या संसदीय राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा जपताना समाजकारण, सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास, पर्यावरण, दुग्ध व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत आमदार थोरात यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

याचबरोबर राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, खार जमीन, राजशिष्टाचार, रोहयो, जलसंधारण असे विविध मंत्रिपदे भूषविताना या सर्व खात्यांना लोकाभिमुख बनविले. महसूलमंत्री पदाच्या काळात ऑनलाईन सातबारा, विद्यार्थ्यांना शाळेत ८० लाख दाखले देण्याचा विक्रम, खंडकरी शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावले, तर शिक्षणमंत्री पदाच्या काळात बेस्ट ऑफ फाईव्ह व कृषिमंत्री पदाच्या काळात एक लाख शेततळ्यांची निर्मिती केली.

राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करताना जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या सहकारी संस्था या देशाला आदर्शवत ठरल्या असून ग्रामीण विकासात संगमनेर तालुका हा मॉडेल ठरला आहे. विधिमंडळ पक्षाचे नेते, प्रदेशाध्यक्ष असे विविध पदे भूषविताना त्यांनी कायम महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले. काँग्रेसच्या सर्वोच्च राष्ट्रीय वर्गीकरण समितीचे सदस्य तसेच हिमाचल व गुजरातचे निरीक्षक म्हणूनही पदे भूषविली आहेत.

२०१८-१९ या काळामध्ये भाजप प्रणित सरकार होते. अशा काळात काँग्रेसकडून विधानसभेत अत्यंत अभ्यासूपणे प्रभावी मांडणी करणारे व सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे नेतृत्व करणारे आमदार बाळासाहेब थोरात यांना उत्कृष्ट संसदपटू हा मानाचा पुरस्कार राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे राज्यभरातील सर्वसामान्य नागरिक व अहमदनगर जिल्हा आणि संगमनेर तालुक्यात मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा जनतेचा सन्मान: आमदार थोरात
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर वाटचाल करत गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण अविश्रांत काम करीत आहोत. यामध्ये तालुक्यातील जनतेचे मोठे प्रेम, कार्यकर्त्यांची फळी, नेतृत्वाचा विश्वास आणि सर्वांचे सहकार्य यामुळे या ४० वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक पुरस्कारांबरोबर उत्कृष्ट संसदपटू हा मिळालेल्या पुरस्कार सर्वसामान्य जनतेच्या सन्मान असल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...