spot_img
अहमदनगरआ. शंकरराव गडाख यांचा खळबळजनक आरोप; संस्थांच्या जोडीने खुनाच्या गुन्ह्यात...

आ. शंकरराव गडाख यांचा खळबळजनक आरोप; संस्थांच्या जोडीने खुनाच्या गुन्ह्यात…

spot_img

महायुतीची मंत्रीपद आणि पक्वान्नाचे ताट नाकारल्याने चौकशा
सोनई | नगर सह्याद्री

साखर कारखान्याची इन्कम टॅक्सची नोटीस, मुळा शिक्षण संस्थेची जागा जमा करण्याचा डाव आणि त्यानंतर माझ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका असा मोठं षडयंत्र माझ्या विरोधात लावले गेले असले तरी तुम्ही सारे सोबत असल्याने मी त्यावर मात करील असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. दरम्यान, महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांच्यासोबत मी जावे यासाठी मंत्रीपदासह पक्वान्नाचे ताट माझ्यापुढे ठेवले. ते मी नाकारले. आता मला खोट्या गुन्ह्यात कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असली तरी मी आता माझं सर्वस्व तुमच्यासाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला असल्याचा निर्धार आ. गडाख यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडील उबाठा गटाचे नेवासा मतदारसंघातील उमेदवार शंकरराव गडाख यांनी सोनई येथे कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख होते. मेळाव्याला माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यासह संपूर्ण तालुक्यातील अबालवृद्धांसह माता- भगिनी आणि विशेषत: तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी बोलताना आ. गडाख म्हणाले की, बांद्रा पोलिस ठाण्यात माझ्यासह प्रशांतभाऊ, गडाख साहेब यांच्याविरोधात फौजदारी गुन्ह्याची याचिका दाखल केली गेली. मागील वर्षात कारखान्याने हिशोब दिला नाही म्हणून पाठवलेल्या दोन पत्राला उत्तर दिले नाही म्हणून इन्कम टॅक्सची नोटीस देण्यात आली. प्रत्यक्षात हे पत्रच भेटलेले नाही. कोणत्याही कारखान्याला वेळेत हिशोब दिला नाही म्हणून इनकम टॅक्सची नोटीस दिली गेली. शाळेची जागा सरकार जमा करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय आणि शिक्षण बंद करुन ही जागा ताब्यात घेऊन सरकार काय साध्य करणार हे समजले नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या जुन्या खेळल्या जातील आणि मला प्रसंगी अटकही केली जाऊ शकते. थांबण्याचा विचार मनात येत असताना तुमच्या पाठींब्यावर आणि प्रेमावर मी पुन्हा लढण्याचा निर्णय घेतला.

मुळा- ज्ञानेश्वर हे दोन्ही कारखाने तुमच्या हिताकरता चालवले जातात. मुळा कारखान्याच्या माध्यामातून शेतकर्‍यांना पुढे नेण्याचे काम केले जाते. कमी खर्चात उत्पादन आणि चोख कारभार, इथेनॉल, सहवीज निर्मिती असे प्रकल्प चालू आहेत. मंत्री झाल्यानंतर सहकारी तत्वावर सहकारी तत्वावरील इथेनॉल प्रकल्प हाती घेतला. कारखान्याच्या स्वनिधीतून हा प्रकल्प हाती घेतला. दुर्दैवाने उत्पन्न झाले नाही. त्यातून अडचण झाली. राज्यात सर्वात कमी खर्चात उभा राहिलेला एकमेव प्रकल्प! मात्र सरकारची मदत झाली नाही. त्यातून कारखान्यासह अनेक अडचणी आल्या. त्याचा फटका बसला. नियम बाजूला ठेवून बंद पडलेल्या कारखान्यांना मदत केली, कर्ज दिले असताना आम्ही नियमात असताना आपल्याला मदत केली नसल्याचा आरोपही आ. गडाख यांनी केला. मंत्रीपद, पैसा सारं काही समोर असताना मी त्यांच्यासोबत गेलो नाही. त्याचे परिणाम म्हणून आता या नोटीसांची भानगड मागे लावली असली तरी त्यास आपण भिक घालणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

सहकारात तंगडी घालण्याचे काम भाजपा सरकार करत असल्याचा आरोप करतानाच शंकररावांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लावल्याचा आरोपही यावेळी पांडुरंग अभंग यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....