spot_img
अहमदनगरआ. रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; अहमदनगरमधील 'तो' प्रश्न...

आ. रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; अहमदनगरमधील ‘तो’ प्रश्न मार्गी लागणार

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
कर्जतमधील घरकुलप्रश्नी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राजीव गांधीनगर, सिद्धार्थनगर, यासीननगर, अक्काबाईनगर, अण्णा भाऊ साठेनगर आणि लहुजीनगर येथील २६७ रहिवाश्यांना ‘रमाई आवास योजने’ अंतर्गत (शहरी क्षेत्र) घरकुल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला असून, मागील तीन वर्षांच्या मालमत्ता पावतीच्या आधारे त्यांना घरकुल बांधण्यास परवानगी मिळणार आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या प्रस्तावास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याचा कर्जत शहरात शासकीय जागेत राहणाऱ्या अघोषित झोपडपट्टीधारकांना फायदा होणार आहे.

शहरात आज नगरपंचायत असली, तरी ग्रामपंचायत काळापासून राजीव गांधीनगर, सिद्धार्थनगर,यासीननगर, अक्काबाईनगर, अण्णाभाऊ साठेनगर आणि लहुजीनगर या भागात शासकीय जागेत अनेक कुटुंबे राहतात. यापैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील २६७ रहिवाश्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असूनही तांत्रिक कारणांनी त्यांना घरकुल बांधण्यास नगरपंचायतकडून परवानगी मिळत नव्हती. नगरपंचायतीकडे बांधकाम परवानगीसाठी आलेले ९१ प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. त्यांना मंजुरी मिळत नसल्याने या कुटुंबांना हक्काच्या घरकुलापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे या कुटुंबांकडून आंदोलनही करण्यात आले होते.

ही सर्व कुटुंबे कर्जत ग्रामपंचायत असतानाच्या काळापासून शासकीय जागेत रहात असल्याने या झोपडपट्टीधारकांनाही घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी मार्ग काढण्याची विनंती आमदार रोहित पवार यांनी केली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली होती, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही
याप्रश्नी भेट घेऊन त्यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा केला आणि हा प्रश्न त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनातही उपस्थित केला होता.

केलेल्या पाठपुराव्याला यश
पात्र असूनही माझ्या मतदारसंघातील अनेक कुटुंबांना हक्काच्या घरकुलापासून वंचित रहावे लागले होते. परंतु याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि याचा माझ्या मतदारसंघासोबतच राज्यातील इतरही गरीब कुटुंबांना फायदा होणार आहे.
रोहित पवार, आमदार

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ जणांकडे काय गवसलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारू विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका लावला. यात १५...

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे बातमी; ‘हे’ काम करा अन्यथा ‘या’ योजनेचा लाभ मिळणार नाही?

मुंबई । नगर सहयाद्री:- मागेल त्याला सोलर पंप योजना अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सौरऊर्जा आधारित पंप...

पारनेर तालुक्यात माती, मुरूम विक्रीचा बोगस धंदा; आ. दाते यांनी दिली मोठी माहिती

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यामध्ये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबवली जात...

‘गोल्डन कॅफे’मध्ये काळा कारभार!; पडद्याआड काय गवसलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील बालिकाश्रम रस्ता परिसरात चालवल्या जात असलेल्या ‘गोल्डन कॅफे’मध्ये अश्लील...