spot_img
देशमान्सून केरळात दाखल? महाराष्ट्रातही 'या' वेळत दाखल होणार

मान्सून केरळात दाखल? महाराष्ट्रातही ‘या’ वेळत दाखल होणार

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
देशातील अनेक शहरांचे तापमान ४२-५० डिग्री पार झाले आहे. वाढता उकाडा व तापमानामुळे हैराण असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून केरळच्या किनारपट्टीत दाखल झाला आहे. मान्सूनच्या या आगमनामुळे बळीराजासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन १० किंवा ११ जून रोजी होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये ३१ मे रोजी धडकण्याची शक्यता होती. पण, तो वेगाने पुढे येत राहिल्याने आजच तो केरळमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान मान्सूनच्या आगमनानंतर देशात म्हणजेच ३१ मे पासून उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. तर येत्या काही दिवसांत अरबी समुद्रातून वारे वाहू लागल्याने तापमानातही काही अंशांची घट अपेक्षित असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राआधी मान्सून कर्नाटकात प्रवेश करणार असून त्यासाठी ६ किंवा ७ जूनची तारीख वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या पुर्वानुमानानुसार राज्यात १० ते ११ जूनदरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, मुंबईपासून मान्सूनची सुरुवात होणार आहे. त्यानंतर १३ ते १४ जूनपर्यंत मान्सून बंगळुरूपर्यंत मजल मारेल असे सांगण्यात येत आहे. उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून उष्णता इतकी वाढली आहे की घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये पारा वाढला आहे. उष्णतेचा कहर सुरूच आहे. अनेक शहरांमध्ये तापमान ५० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

तसेच पुढील काही आठवड्यांत मध्य आणि उत्तर भारतालाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. तर बुधवारी हवामान खात्याने अंदाज वर्तवला की, मान्सून केरळकडे सरकत आहे, जो आतापर्यंत मालदीवच्या आसपास होता तो आता केरळकडे सरकत आहे. त्यानंतर मग तो उत्तर पूर्व राज्यांकडे सरकणार आहे. तसेच उष्णतेच्या लाटेचा सामना करणार्‍या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यासाठीही हवामान खात्याने दिलासादायक बातमी दिली आहे.

उष्णतेची लाट ओसरणार
दि. ३० मे पासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होणार आहे. पुढील एका आठवड्यात ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगला पाऊस होईल. त्रिपुरा, मिझोराम, मणिपुर, नागालैंड, आसाम आणि मेघालयमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सिक्कीम आणि बंगालमध्येही हवामान बदलणार आहे. या राज्यात पुढील दिवसात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच बंगाल, झारखंड, बिहार व्यतिरिक्त ओडिशामध्ये ३१ मे ते २ जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळ येण्याचीही शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यामध्येही हवामान बदलणार आहे. तर डोंगराळ भागात हलका पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...