spot_img
महाराष्ट्रआ. जगताप यांच्या पाठपुराव्यास यश! ११५ कोटी मंजूर; कुणाला मिळणार नवी घरे?

आ. जगताप यांच्या पाठपुराव्यास यश! ११५ कोटी मंजूर; कुणाला मिळणार नवी घरे?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
लालटाकी येथील पोलिस वसाहतीमध्ये पोलिसांना 320 फ्लॅट मिळणार असून यासाठी 115 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली आहे. पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांच्या शासकीय वसाहतीची दुरावस्था झाली होती. त्यामुळे याठिकाणी नवीन इमारत व निवासस्थानाच्या बांधकामासाठी मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

आ. जगताप यांनी 2023 साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच विधानभवनात तारांकित प्रश्नही उपस्थित करत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. आता आ.जगताप यांच्या या पाठपुराव्यास यश आले.

राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने नुकतीच अहिल्यानगर मधील सर्जेपुरा येथे असलेल्या पोलीस वसाहतीच्या जागेवर नवे 320 फ्लॅट बांधण्यासाठी 115 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाच्या मंजुरीची वर्क ऑर्डर महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने काढली आहे. जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

आता त्यांना लवकरच नवे घरे मिळतील, अशी माहिती आविष्कार ग्रुपचे मनोजकुमार जाधव यांनी दिली.अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा येथे असलेल्या पोलिस मुख्यालय येथील जागेवर सध्या असलेली घरे पाडून तेथे नवे बहुमजली अपार्टमेंट उभारून 500 स्क्वेअर फुटाचे, 320 टूबीएचके फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. तसेच पाण्याची टाकी, अंतर्गत पथदिवे व अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसही उभारण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाबांच्या शिर्डीत चाललंय काय?; गावात खळबळ, मध्यरात्री काय घडलं..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी येतात, त्याच शिर्डी...

१० मार्चला सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; लाडक्या बहि‍णींना २१०० देणार?, सल्लागार समितीची बैठक

State Budget Session : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. 3 मार्च...

शिवसेनेत आउटगोइंग नंतर पुन्हा मोठे इन्कमिंग; किरण काळे यांचा शिवसेनेत प्रवेश…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, आक्रमक नेते किरण काळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेते...

सोनाराच्या दुकानात दरोडा! हरियाणाच्या टोळीचा कहर, ‘म्होरक्या’ गजाआड

Maharashtra Crime News: सोन्याच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून भर दिवसा दरोडा टाकत तिघांनी सराफास...