spot_img
अहमदनगरआ. जगताप यांचे मनपात ठिय्या आंदोलन; मागणी काय?

आ. जगताप यांचे मनपात ठिय्या आंदोलन; मागणी काय?

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील अतिक्रमणे व खासगी जागेत पत्र्याचे शेड उभारून केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. कारवाई सुरू झाल्याशिवाय हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने पारिजात चौकातील पत्र्याच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली. जेसीबीच्या साहाय्याने चार गाळे जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी जागा मालक व गाळेधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करत सर्वांना बाजूला केले. मंगळवारी सकाळी पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली.

अनाधिकृतपणे बांधकामे करून, अतिक्रमणे करून जागा बळकवण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. त्यावर तत्काळ कारवाई सुरू करा, अशी मागणी करत आमदार जगताप व त्यांच्या समर्थकांनी आयुक्त दालनात ठिय्या दिला. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख अनिकेत बल्लाळ व अभियंता सुरेश इथापे यांच्यासह मनपाचे पथक पारिजात चौकात पोहोचले. गाळेधारकांनी कारवाईला विरोध केला. आयुक्तांशीही चर्चा केली. गाळे खाली करण्यास गाळेधारक तयार नसल्याने अखेर पथकाने जेसीबीच्या साहाय्याने चार गाळे जमीनदोस्त केले.

या जागेत सुमारे 15 ते 16 अनधिकृत पत्र्याचे शेड असून उर्वरित गाळे काढण्यासाठी मंगळवारी सकाळी पुन्हा कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मनपाने कारवाई सुरू करताच जागामालक व गाळेधारकांनी गाळे खाली करण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. मात्र, आम्हाला कारवाईचे आदेश असल्याचे सांगत पथकाने कारवाई सुरूच ठेवली. गाळेधारकांनी जेसीबीवर चढून, आडवे येऊन कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना बाजूला केले.

काही गाळेधारक व पोलिसांमध्ये झटापटही झाली. मात्र, कारवाई सुरूच ठेवण्यात आली. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण धारकांना यापूवच कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार शहरात कारवाई सुरू आहे. पारिजात चौकातील अनधिकृत गाळ्यांना यापूवच नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. नियमानुसार कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणामुळे ढवळून निघाले असून, शिवसेना...

थाटामाटात लग्न पार पडले अन् ‘नवरदेवा’वरच गुन्हा दाखल झाला! काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी...

मुख्याध्यापकाकडे मागीतली पाच लाखांची खंडणीची; ‘या’ संस्थेच्या चेअरमनसह दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षकाने शाळेच्या चेअरमन आणि स्वीकृत सदस्यावर...

209 बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांतील ११ आरोपींची 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

मुंबई | नगर सह्याद्री:- मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर 2006 रोजी 11 मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या...