spot_img
अहमदनगर'आ. जगताप यांच्या स्वागताला बालगोपालही सरसावले'

‘आ. जगताप यांच्या स्वागताला बालगोपालही सरसावले’

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी (दि.18 नोव्हेंबर) भिस्तबाग, सावेडी येथून नगर विकास यात्रा काढण्यात आली.

यावेळी नागरिकांसह युवक-युवती व महिलांनी मोठ्या उत्साहात आ. जगताप यांचे स्वागत केले. चौकाचौकात महाकाय पुष्पहाराने त्यांचा सत्कार करण्यात आला. आ. जगताप यांना पुणेरी टोपी घालून हातात वीणा देऊन पारंपारिक पध्दतीने सन्मान करण्यात आला.

बाल वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या निनादात, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करुन आ. जगताप यांचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले. प्रचार रॅलीत महिलांसह युवकांची संख्या प्रेक्षणीय होती.

बालगोपाल देखील स्वागतासाठी हजर होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भिस्तबाग परिसरातून नागरिकांनी आ. जगताप यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या खुशखबर मिळण्याचे संकेत..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल....

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...