मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक शहरांमध्ये तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ‘उत्तरेकडील थंड वारे आणखी सक्रिय झाल्यामुळे आगामी काळात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे’. शुक्रवारी अनेक ठिकाणी तापमानाचा पारा खाली आला. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत असून, पुढील काही दिवसांत संपूर्ण राज्यात तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर आणि पिकांवर होणाऱ्या परिणामाकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यात थंडीचा कडाका कुठे? जाणून घ्या
जळगाव – 12.6 अंश
अमरावती – 13.1 अंश
महाबळेश्वर – 13.8 अंश
नाशिक – 14.2 अंश
पुणे – 17.3 अंश



