spot_img
अहमदनगरराज्यात थंडीची लाट? ; मध्य महाराष्ट्रासह अहिल्यानगर किमान तापमान सर्वात कमी !...

राज्यात थंडीची लाट? ; मध्य महाराष्ट्रासह अहिल्यानगर किमान तापमान सर्वात कमी ! वाचा कुठे किती असणार तापमान

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
Cold Wave Maharashtra। राज्यात आधीच तापमान कमी झाले आहे. त्यातच आता कुडकुडायला लावणारी थंडी राज्यात पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण आता यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाच्या नोंदींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यात थंडीची लाट येण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के एस होसाळीकर यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राज्यात येत्या काही दिवसात आणखी तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या राज्यात 11 ते 14 अंशांपर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान, हे तापमान आणखी खाली जाऊ शकते असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय राज्यात काही ठिकाणी थंडीची लाटदेखील येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता वाढली असून राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र वगळता येत्या 24 तासांत किमान तापमान 8 ते 14 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

थंडीची लाट कुठे आणि कधीपासून?
हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उत्तरेकडील राज्यांनंतर आता राज्यातही काही भागात थंडीच्या लाटेला सुरुवात होणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 15 व 16 म्हणजे आज थंडीची लाट असून पहाटे दाट धुक्याची चादर, तापमान निचांकी राहण्याची शक्यता आहे. राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा खालावलाय. बोचऱ्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र गारठलाय. ठिकठिकाणी शेकोटीच्या उबेला नागरिक बसल्याचं चित्र दिसत असून दुपारपर्यंत गारठा कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलय. विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान प्रचंड घसरले आहे.

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, लक्षद्विपला जोडून अरबी समुद्राच्या पूर्वेकडीलभागात चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरात येत्या 24 तासांत पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र व कोकण भागात तापमान 1 ते 2 अंशांनी वाढणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...