spot_img
ब्रेकिंगदिवाळीनंतर आचारसंहिता! महायुतीच्या 'बड्या' नेत्याने सांगितला निवडणूक आयोगाचा प्लॅन

दिवाळीनंतर आचारसंहिता! महायुतीच्या ‘बड्या’ नेत्याने सांगितला निवडणूक आयोगाचा प्लॅन

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक आहे. कदाचित आज (4 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल. आता कुणीतरी म्हणतील निवडणूक आयोगाशी दादांची चर्चा झाली वाटतं. मी 40 वर्षे यामध्ये घालवली त्यामुळे मी अंदाज मांडला आहे. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. आज भाजपचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीसाठी कानमंत्र दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2019 साली ज्यांचे तिकीट नाकारले त्या बावनकुळे यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार मिळाले.निवडणूक ही फास्ट ट्रेन प्रमाणे आहे, प्लॅटफार्मवर जो राहील तो राहील. मात्र, नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नाबरोबर नशीब देखील लागतं. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक असला पाहिजे. 2017 ची परिस्थिती बदला, त्यासाठी येणाऱ्या दिवाळीचा फायदा करून घ्या.

लोकांना भेटून संपर्क वाढवा. निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील, असे ते म्हणाले. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाईल असं लढणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले 2019 साली उध्दव ठाकरे यांनी थोडा समजूतदार दाखवला असता तर हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शोधावं लागलं असतं, पण ते अडून बसले नाही, तर राज्यात चित्र वेगळं दिसलं असतं. नियती ही नियती असते, 2019 साली सरकार जाणं हा नियतीचा खेळ आहे. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी हे सगळं करून काय मिळवलं? उतू नको मातू नको, घेतला वसा सोडू नको. निवडणुका होऊन जातील पण पार्टीसाठी काम करत राहील पाहिजे. मी कधीच कोणतं तिकीट मागितलं नाही, नेत्याची इच्छा म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आज्ञा असल्याचे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी आमदार नंदकुमार झावरे पुन्हा विखे पाटलांच्या व्यासपीठावर, राजकीय चर्चांना उधाण!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पारनेरच्या राजकारणात निर्णायक भूमिका घेत निलेश लंके यांना आमदार करण्यासह त्यांना...

अहिल्यानगर हादरले! भाड्याच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळली तरुणी, जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचे भयंकर कृत्य

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शहरातील सावेडी उपनगरातील भिस्तबाग परिसरात एका भाड्याच्या खोलीत महाविद्यालयीन युवतीवर...

शहरातील रस्ते घोटाळा प्रकरण पुन्हा तापले; किरण काळे यांची उच्च न्यायालयात धाव, भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत नागरिकांचा सहभाग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कामे अर्धवट अवस्थेत...

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; सणासुदीच्या काळात बाजारभावात घसरण

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर फुलांना अपेक्षित बाजारभाव मिळेल, या...