spot_img
महाराष्ट्रCM शिंदेंची प्रकृती बिघडली; ज्यूपिटर रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले, सध्या...

CM शिंदेंची प्रकृती बिघडली; ज्यूपिटर रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले, सध्या…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप सुधारणा झाली नसल्याचे समोर आलेय. तीन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना १०५ डिग्री ताप आलेला, त्यामुळे दरे गावात त्यांच्यावर उपचार झाले. पण मुंबईत परतल्यानंतरही शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये जास्त सुधारणा नसल्याचे समोर आले आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना ज्यूपिटर रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिंदेंना दोन दिवस आराम करण्याता सल्ला डॅाक्टरांनी दिला आहे. त्यांची डेंगी, मलेरिया याची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॅाक्टरांनी सांगितले आहे.

गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे अचानक सातऱ्यातील दरे गावात गेले होते. दिल्लीमध्ये अमित शाह यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे दरे गावात गेले होते. दरे गावात गेल्यानंतर त्यांना ताप आला होता. १०५ इतका त्यांना ताप आला होता. त्याशिवाय अशक्तपणाही होता. फॅमिली डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी वेगात सुरू होत्या.

त्यामुळे शिंदेंना मुंबईत परत यावं लागले. आता मुंबईमध्ये आल्यानंतरही शिंदेंच्या प्रकृतीमध्ये अद्याप सुधारणा झाल्याचं दिसत नाही. आज एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्यासोबत नियोजित बैठक होणार होती. आता आजारपणामुळे शिंदे बैठकीला जाणार का? याची राजकीय चर्चा सुरू आहे.

तपासणीचा काय आला रिपोर्ट
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची तब्बेत बरी नव्हती. आता त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. अशक्तपणा आणि ताप असल्याने त्यांना सलाईन देखील लावण्यात आलं आहे. तर डेंग्यु आणि मलेरियाची सध्या साथ सुरू असल्याने त्याची देखील तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल नेगेटिव्ह आला आहे. त्यांच्या पांढऱ्या पेशींची संख्या सातत्याने वरखाली होत आहेत. त्यामुळे आजारपणाचं कारण शोधण्याचा डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू असून अॅंटीबायोटिक औषधांचा डोस दिला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....