spot_img
ब्रेकिंग"सी एम शिंदे मौलानाचा वेश धारण करून..."; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

“सी एम शिंदे मौलानाचा वेश धारण करून…”; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे आरोप केले आहेत. राऊत यांनी दावा केला की, शिंदे दिल्लीला मौलवीच्या वेशात जात असत. “एकनाथ शिंदे वेगळ्या विमानतळावरून दिल्लीला जात असताना मौलवीच्या वेशात गेले आहेत. त्यांना दाढी आहेच. पण माझ्या माहितीनुसार, नाव बदलून त्यांनी मौलवीचा वेश धारण केला होता,” असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला.

पुढे बोलतांना खा. राऊत म्हणाले, शिंदे यांनी धर्मवीर चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि ते स्वतःला आनंद दिघे यांचे शिष्य मानतात. तथापि, शिंदे दिल्लीला मौलवीच्या वेशात अनेकदा गेले आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

तसेच, अजित पवार हे देखील वेशांतर करून दिल्लीला येतात, मात्र त्यांना कोणालाही अडवले जात नाही शिंदे यांनी बनावट ओळखपत्रे, पॅनकार्ड, पासपोर्ट आणि आधारकार्ड बनवले आहेत. यासोबतच, त्यांच्या वेशांतराच्या अडचणींना कोणताही अडथळा येत नाही, असा आरोप राऊत यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...