बोल्हेगाव परिसरातील नागरिकांची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
बोल्हेगाव परिसरातील चिंतामणी कॉलनी येथे गेल्या काही दिवसांपासून राहत्या घरात नाजूक व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे कॉलनीत राहणे नागरिकांसाठी मुश्किल झाले आहे. कॉलनी सुरु असलेला प्रकार कायमस्वरुपी बंद व्हावा अशी मागणी चिंताणी कॉलनीतील रहिवासी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
चिंतामणी कॉलनी येथे बाबासाहेब जाधव व राणी उर्फ ललिता ठुबे हे अनेक दिवसांपासून राहत्या घरात सेक्स रॅकेट चालवत आहेत. याबाबत त्यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. कॉलनी सुरु असलेल्या या प्रकारामुळे नारिकांना तेथे राहणे अवघड झाले आहे. रात्री अपरात्री कॉलनीत धिंगाणा सुरु असतो. त्यामुळे महिलांना घराबाहेर पडले अवघड झाले आहे. जाधव आणि ठुबे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. परंतु, कॉलनीत सुरु असलेला त्यांचा व्यवसाय कायस्वरुपी बंद करण्यात यावा, त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कॉलनीतील गिता कांबळे, पल्लवी कवाने, भारती राऊत, तेजस्विनी दसरे, सुवर्णा होले, गीता खोबरे, मनिषा भुकन, शांताबाई भुकन, वैष्णवी भूकन, निर्मला साठे, कोमल साठे, आशियाना शेख यांच्यासह ३०-३५ महिलांनी केली आहे. पोलिस प्रशासनाने चिंतामणी कॉलनीतील सदर प्रकार बंद न केल्यास तीव आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.