संगमनेर / नगर सह्याद्री –
श्री हनुमान जयंती निमित्त महाराष्ट्रातील विविध ठिकाणी व मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हनुमान जयंतीनिमित्त राज्यात उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या जात आहे. याच उत्साहाच्या वातावरणाला गालबोट लागलेत. अहिल्यानंतरमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत जोरदार राडा झाला आहे. आमदार आणि पोलिसांसमोरच राडा झाल्यामुळे याची नगरमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
अहिल्यानगरच्या संगमनेर शहरात हनुमान मिरवणुकीत जोरदार राडा पाहायला मिळाला. पोलीस आणि आमदारांसमोरच हनुमान रथ मिरवणुकीत जोरदार राडा झालाय. आयोजक आणि ढोल वादक या मिरवणुकीत भिडले. हनुमान रथासमोर ढोल वादनावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
स्थानिक आमदार अमोल खताळ आणि पोलिसांसमोरच हनुमान मिरवणुकीत जोरदार राडा झाला. ऐन मिरवणुकीत जोरदार राडा झाल्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत आयोजक आणि ढोल वादक यांच्यातील वाद मिटवला. वाद निवळल्यानंतर पोलिस बंदोबस्तात पारंपरिक पद्धतीने रथ मिरवणूक संपन्न झाली.