spot_img
ब्रेकिंगनगरमध्ये शाळेतच विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा; तुफान दगडफेक

नगरमध्ये शाळेतच विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा; तुफान दगडफेक

spot_img

जेऊर येथील घटना; चॉपर, केबल, काठ्यांचा वापर,
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

नगर तालुयातील जेऊर येथे रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थ्यांचे दोन गट परस्परांना भिडून मोठी धुमश्चक्री शुक्रवार दि.७ रोजी झाली. घटनेत चॉपर, केबल, सत्तुर, दांडयांचा वापर तर तुफान दगडफेक करण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून समजलेली माहिती अशी की, संतुकनाथ विद्यालयात इयत्ता दहावीचा पेपर असल्याने विद्यालय लवकर सुटले होते. विद्यालय सुटल्यानंतर गावातील मुंजोबा चौकात ससेवाडी येथील एक गट तर मेहेत्रे वस्तीवरील एक गट परस्परांना भिडले व मोठी धुमश्चक्री झाली. तुंबळ हाणामारी सुरू असताना गावातील सुज्ञ नागरिक व एमआयडीसी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी पलायन केले. या घटनेत काही जण जखमी झाले. परंतु शाळेतील विद्यार्थ्यांकडे घातक चॉपर, सत्तुर, सु-यासारखी हत्यारे आढळून येत असल्याने पालक व शिक्षकांसाठी हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून या गटांमध्ये धुसफूस सुरू असल्याची ही माहिती मिळत आहे. इयत्ता आठवी, नववी व दहावीतील विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. सुरुवातीला दोन्ही गट विद्यालयाच्या मैदाना शेजारीच आमने-सामने आले होते. परंतु शिक्षकांनी मध्यस्थी केल्याने त्यावेळी वाद मिटला. परंतु पुढे मुंजोबा चौकात आल्यानंतर दोन्ही गट पुन्हा एकमेकांना भिडले व तुफान हाणामारी झाली. यावेळी अल्पवयीन असलेल्या विद्यार्थ्यांकडे चॉपर, सत्तूर सारखी घातक हत्यारे असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सुमारे ५० ते ६० विद्यार्थ्यांचा घोळका आमने-सामने आला होता. दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण बनले होते. सदर घटना मुलींच्या छेडछाडीवरून झाल्याची चर्चा आहे. जेऊर येथील घडलेल्या घटनेवरून ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. घातक हत्यारे बाळगणा-या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील ग्रामस्थ करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...