spot_img
महाराष्ट्रमुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत आदळआपट?; कोण काय म्हणाले पहा...

मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत आदळआपट?; कोण काय म्हणाले पहा…

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री
राज्याचे दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचा वाढदिवस होता. दोघांनाही एकत्र शुभेच्छा देणारे बॅनर लागले होते. मात्र, एकीकडे अजित पवारांनी कट केलेल्या केकची आणि दुसरीकडे फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यांची चर्चा रंगली आहे. तर तिसरीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली. महायुतीच्या नेत्यांमधील वक्तव्यांना मुख्यमंत्रिपद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर पुढील निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील. त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदावर आमचाच दावा असणार आहे, असं ठाण्याचे शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. तर नरेश म्हस्के हे काही पक्षप्रमुख नाहीत, असं प्रवीण दरेकर म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत ठिणगी पडली आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

मुख्यमंत्रिपद एक आणि सवाल अनेक अशी परिस्थिती झाली आहे. मात्र, यावरुन थेट होऊ लागल्याचेही चित्र आहे. याच कारण गेल्या काही दिवसांत राज्यात घडत असलेल्या घडामोडी आहेत. अजित पवारांच्या वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. कार्यकर्त्यांना पाच मजली केक आणला. मात्र, केकवर लिहिण्यात आलेल्या मजकुराची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. “मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की”, अशा आशयाचा मजकूर या केकवर लिहिण्यात आला होता.

दरम्यान, अजित पवारांनी केक कट केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रि‍पदाबाबत भाष्य केलं. “मला कार्यकर्ते विचारतात मुख्यमंत्री कोणाचा होणार, मी सांगतो मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे. यानंतर कोण मुख्यमंत्री आणि कोणाचा मुख्यमंत्री असा प्रश्न विचारु नका” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरुन देवेंद्र फडणवीस यांनी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के यांनी फडणवीसांच्या वक्तव्यांना केराची टोपली दाखवली. तर पुढील निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील. शिवाय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही लढणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदावर आमचाच दावा असणार आहे, असं नरेश म्हस्के म्हणाले. तर नरेश म्हसके पक्षप्रमुख नाहीत. तिन्ही पक्षांचे नेते प्रमुख ठरवतील. महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. वाद होईल, अशी वक्तव्य नरेश म्हस्के यांनी करु नयेत. आता ते खासदार आहेत, त्यांनी जबाबदारीने बोलावे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...