spot_img
अहमदनगरसाईदीप हॉस्पिटलमुळे नगरचा आरोग्य क्षेत्रात नावलौकिक : डॉ. अश्विन मेहता

साईदीप हॉस्पिटलमुळे नगरचा आरोग्य क्षेत्रात नावलौकिक : डॉ. अश्विन मेहता

spot_img

मुंबई, पुण्यासारख्या महानगरातील आरोग्य सेवा नगरमध्ये उपलब्ध

अहमदनगर | नगर सह्याद्री –
साईदीप हॉस्पिटलमध्ये मुंबई पुणे व इतर महानगरांत असलेल्या अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. यामुळे आरोग्य क्षेत्रात अहमदनगरचा नावलौकिक झाला आहे, असे प्रतिपादन जसलोक हॉस्पिटल मुंबई येथील हृदयरोग विभाग प्रमुख डॉ. अश्विन मेहता यांनी केले.

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याच्या निमित्ताने डॉ. मेहता, डॉ. अजित देसाई व त्यांच्या टीमने  नुकतीच साईदीप हॉस्पिटलला भेट दिली. साईदीप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स व इतर अत्याधुनिक सुविधा यामुळे अहमदनगरचे मुंबई, पुण्याच्या धर्तीवर उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान केली जात आहे, असे असे गौरवोद्गार डॉ. मेहता यांनी काढले. साईदीप हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. दीपक एस. एस. यांनी डॉ. अश्विन मेहता यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. अजित देसाई, डॉ्. आर. आर. धूत, डॉ. श्यामसुंदर केकडे,  डॉ. निसार शेख,  डॉ. कैलास झालानी, डॉ. रवींद्र सोमाणी, डॉ. हरमीत कथुरिया, डॉ. व्ही. एन. देशपांडे,  डॉ. एस. एम. इबाल, सौ. ज्योती दीपक, सौ. अनिता झालानी, डॉ. किरण दीपक, डॉ. वैशाली किरण, डॉ अनिकेत कुर्‍हाडे, डॉ भूषण खर्चे, व अन्य डॉटर उपस्थित होते.

डॉ. मेहता म्हणाले, नगर जिल्ह्यासारख्या ठिकाणी मुंबई, पुणे व इतर महानगरांमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक आरोग्य सेवा डॉ. दीपक व त्यांचे सहकारी यांनी साईदीप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देत महानगरांत व नगरमध्ये मोठा फरक राहिलेला नाही . वैद्यकीय सेवा  इथे अविरत प्रदान करण्यात येत आहेत. मी व माझे सहकारी डॉ . अजित देसाई, आमचे अन्य डॉटर्स यांनी साईदीप हॉस्पिटलमध्ये काही हृदयविकाराच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या . यावेळी साईदीप हॉस्पिटल मधील अत्याधुनिक आरोग्य सेवा,  उत्कृष्ट स्वच्छता आणि रुग्णांसाठी असलेल्या सर्व आरोग्य सेवा उच्च प्रतीच्या असल्याचे प्रकर्षाने जाणवले.

डॉ. दीपक यांनी सांगितले की,  डॉ. अश्विन मेहता हे हृदयविकार क्षेत्रातील एक खूप मोठे व्यक्तिमत्व असून त्यांनी आम्ही केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे. यामुळे साईदीप हॉस्पिटल व साईदीप हॉस्पिटलचे  आमचे सर्व मित्र सहकारी संचालक आम्ही भारावून गेलो आहोत.  डॉ. आर. आर. धूत यांनी सर्वांचे आभार मानले. हृदयविकाराच्या गुंतागुंतीच्या  ५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. साईदीप हॉस्पिटल मधील हृदयविकार विभाग प्रमुख डॉ. किरण दीपक,  डॉ. श्रीधर बधे, डॉ. गणेश मैड, भूल तज्ञ डॉ. भाग्यश्री राऊत तसेच सहाय्यक भरत डेंगळे,  विजय बिडवे, कुमारी शेख अमरीन, संतोष सांगळे, स्वप्नील मूनतोंडे व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते.

२०११ मध्ये जुने दीपक हॉस्पिटल च्या रोप्यमोहोत्सवी वर्षानिम्मित आयोजित कार्यक्रमास उपस्थित न राहता आल्याने डॉ अश्विन मेहता यांनी त्यावेळी डॉ दीपक यांनी नगर मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने अनेक हृदयविकार ग्रस्त पेशंटचे जीव वाचवले कॉरोनरी अंजियोग्राफी आणि पहिली कॅथलॅब सुरु करून अंजियोप्लास्टि शस्त्रक्रिया केल्या आणि पुढे त्यांचे चिरंजीव डॉ. किरण दीपक यांनी दीपक हॉस्पिटल मध्ये अनेक रुग्ण बरे केले असा कौतुकाचा संदेश पाठवला होता. पुढे साईदीप ची निर्मिती होऊन पूर्वीपेक्षा अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री चा वापर करून आरोग्य सेवा अविरत सुरु ठेवल्या या डॉ. मेहता यांनी  संदेशाची आठवण ठेऊन माझा संदेश तुम्ही सिद्धिस नेला म्हणून साईदीप हॉस्पिटल चे चेअरमन डॉ. दीपक यांचा डॉ. अश्विन मेहता यांनी सत्कार केला.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...