अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भारताने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.अहिल्यानगर येथील तिरंगा फाउंडेशन, राजे ग्रुप, वाडिया मॉर्निंग ग्रुप व सुप्रभात ग्रुप कडून भारतीय सैन्याचे कौतुक करत फटाके फोडून, तिरंगा फडकवून मोठा जल्लोष करण्यात आला.
लोकमान्य टिळक रस्त्यावर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापाशी हा जल्लोष करण्यात आला. यावेळी नगर शहरातील तरुण भारत माता की जय,.पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत भारतीय सैनिकांचे आत्मबल वाढविले. काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल बोलताना संभाजी कदम म्हणाले की भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लष्करे तोयबा, जैश ए मोहंमंद सारख्या अतिरेक्यांच्या अंड्यांवर मिसाईल ने हल्ले करून ती नेस्तनाबूद करण्यात आली व जशास तसे उत्तर अतिरेक्यांना देण्यात आले. ही बाब भारतीयांना अभिमानाची असून त्याबद्दल भारतीय सेनेचे त्यांनी अभिनंदन केलं.
डॉ. सतीश फडके यांनी देखील भारतीय सेनेचे कौतुक करून सेनेचे अभिनंदन केले. यासाठी दयानंद वाबळे, प्रवीण बेंद्रे, अतुल डागा, संतोष बोथरा, डॉ. सतीश कदम, मनीष सोहनी, योगेश चुत्तर, संतोष तनपुरे, आकाश भन्साळी, अनिल येलमाने, अनिल गुंजाळ, संतोष गाडे, सारंग उदवंत, मनोज जैन, गणेश पालवे, सुभाष काळे, संतोष धोत्रे, शिवाजी शिंदे, नवरत्न डागा यांनी पुढाकार घेतला होता.