spot_img
अहमदनगरभिस्तबाग परिसरातील 'त्या' कार्यालयाला नागरिकांनी ठोकले टाळे; कारण काय?

भिस्तबाग परिसरातील ‘त्या’ कार्यालयाला नागरिकांनी ठोकले टाळे; कारण काय?

spot_img

जुना मीटर द्या, वाढीव बिल रद्द करा; अन्यथा बिल भरणार नाही; संपत बारस्कर
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरामध्ये महावितरण विभागाकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असून नागरिकांना सरासरी 2 ते 3 हजार रुपये वाढीव लाईट बिल येत आहे. याआधी जुन्या मीटरवर सरासरी केवळ 500 ते 1 हजार रुपये इतकं लाईट बिल येत होतं. मात्र स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिलात प्रचंड वाढ झाल्याने संतप्त नागरिकांनी भिस्तबाग महावितरण कार्यालयाला जाब विचारत जोरदार निदर्शने केली. आक्रमक झालेल्या नागरिकांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला टाळे ठोकले. वाढील वीज बिल कमी करण्याची मागणी केली.

महावितरणने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा सर्व ग्राहकांनी बिल भरणं थांबवावं, असा स्पष्ट इशारा दिला. सर्वसामान्य नागरिक महागाईच्या काळात घरखर्च चालवत आहेत. अशा परिस्थितीत एका सामान्य कुटुंबाला महिन्याला 2 ते 3 हजार रुपयांचे लाईट बिल भरणं शक्य नाही. वाढीव बिल हा लोकांवर अन्याय आहे. जर 8 दिवसांच्या आत हा प्रश्न माग लागला नाही, तर महावितरण कार्यालयावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी यावेळी दिला.

या आंदोलनात माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, संभाजी पवार, परिसरातील महिला नागरिक, ज्येष्ठ नागरिक, तसेच नवीन वसाहतींतील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संतप्त नागरिकांनी एकमुखाने महावितरण मुर्दाबादफ, आमच्या खिशाला आग लावणारे बिल आम्हाला नको, अशा घोषणा देत निषेध नोंदवला. यावेळी संतप्त नागरिकांनी सांगितलं की, जुने मीटर अधिक विश्वासार्ह होते. त्यावर आलेली बिलं वाजवी होती. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर यंत्रणेतील पारदर्शकता हरवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या हातात काहीच राहिलं नाही. आम्ही बिल भरतो पण अजून वाढतंच आहे. काहीच उपयोग नाही. महिन्याचा किराणा भरायचा की लाईट बिल भरायचं, असा प्रश्न समोर उभा राहिलाय.

तर कार्यालय बंद पाडून
वाढीव वीज बिल आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. 8 दिवसांत समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत. गरज पडल्यास वीज वितरण कार्यालय बंद पाडू. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढा दिला जाईल असे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळूतस्करी

| देसवडे, मांडवे खुर्द, वासुंदे, पळशी परिसरात वाळूतस्करांचा उच्छाद | पोलिसांच्या नाकावर टिच्चून टाकळी...

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’; आ. दाते यांच्या विजयानंत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश..

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी...

आडतेबाजारातील ‘ती’ कारवाई थांबवा; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, जुना दाणे डबरा, वंजार गल्ली, तपकीर...

सरपंच, उपसरपंचाला शिवीगाळ, ग्रामस्थावर प्राणघातक हल्ला; नगर तालुक्यातील ‘या’ गावात धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- घोसपुरी (ता. अहिल्यानगर) येथील स्मशानभूमीत झाडे लावण्याच्या कामादरम्यान सरपंच किरण साळवे...