spot_img
अहमदनगरकूकडी डावा कालव्याचे आवर्तन सुटले!; आ. दाते सर यांच्या पाठपुराव्याला यश

कूकडी डावा कालव्याचे आवर्तन सुटले!; आ. दाते सर यांच्या पाठपुराव्याला यश

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
कुकडी डावा कालव्यातून रविवारी दुपारी पाणी सोडण्यात आले असून पारनेर तालुक्यातील कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी पोहचले आहे. या आवर्तनामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्न तात्काळ प्रश्न मार्गी लावल्याने निघोज परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.

कुकडी कालव्याच्या लाभ क्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे चारा पिके, फळबाग, इतर शेतीमाल जळण्याची भीती निर्माण झाली होती यामुळे आमदार काशिनाथ दाते सर यांनी ठरलेल्या आवर्तनाच्या पाच दिवस अगोदर पाणी सोडावे अशी आग्रही मागणी आ. काशिनाथ दाते सर यांनी शेतकऱ्यांचे मागणी प्रमाणे कार्यवाही व्हावी म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता.

आमदार दाते सर यांच्या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ना. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी तात्काळ कुकडी प्रकल्पाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांना आवर्तन सोडण्याचा आदेश त्यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी ( दि १६ ) रोजी आवर्तन सोडण्यात आले आहे. शेतकर्‍यांना या आवर्तनाचा गरजेच्या वेळी सुटलेले असून अगोदर आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष व निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा सचिन वराळ पाटील यांनी पाणी सोडल्याबद्दल आनंद व्यक्त करीत संबधीतांचे आभार मानीत धन्यवाद व्यक्त केले आहे.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार काशिनाथ दाते सर यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, राळेगण थेरपाळ सरपंच पंकज कारखीले यांनी सातत्याने विकासाभिमुख भुमिका घेऊन पाण्याच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याची माहिती वराळ पाटील यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाणीपट्टीत वाढ, १ एप्रिलपासून किती होणार वाढ पहा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - तब्बल २२ वर्षानंतर महानगरपालिकेने घरगुती वापराच्या पाणीपट्टीत ९०० ते...

अण्णा हजारे आक्रमक, दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी

पारनेर / नगर सह्याद्री - समाजसेवक अण्णा हजारे वयाच्या ९० व्या वर्षी पुन्हा सक्रीय...

बापरे! दहावीचा पेपर फुटला; उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वाटल्या

जालना / नगर सह्याद्री - दहावी बोर्डाची परीक्षा आजपासूनच सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी...

कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीचा कहर! थेट मंत्र्याच्या कार्यालयातील व्यक्तीला मारहाण; पुण्यात खळबळ

पुणे / नगर सह्याद्री : कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ...