spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये सिनेस्टाईल थरार, पहिल्या पतीचा घटस्फोटीत पत्नीवर गोळीबार! कुठे घडली घटना? पहा..

अहमदनगरमध्ये सिनेस्टाईल थरार, पहिल्या पतीचा घटस्फोटीत पत्नीवर गोळीबार! कुठे घडली घटना? पहा..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
घटस्फोट दिलेल्या पत्नीच्या दुसऱ्या विवाहाला पंधरा दिवस झाले नाही, तोच तिच्या सासरी जाऊन पहिल्या पतीने गोळीबार केल्याची घटना घडली. त्यात महिलेचा सासरा गंभीर जखमी झाला आहे. तालुक्यातील हत्राळ येथे बुधवारी (दि. २६) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. माणिक सुखदेव केदार (वय ५५) असे जखमीचे नाव असून, आरोपी सुभाष विष्णू बडे (वय ३०, रा. वेळी, पाथर्डी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी: पाथर्डीपासून आठ किलोमीटरवर असेलेल्या हत्राळ येथे माणिक सुखदेव केदार (वय ५५) व त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.ते रात्री आठच्या सुमारास जेवण करत असताना सुभाष विष्णू बडे तेथे आला व त्याने त्याच्याकडील पिस्तुलातून गोळी झाडली. ती गोळी केदार यांच्या डाव्या बरगडीच्या वर लागली. त्यामुळे केदार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गोळी शरीरातच असल्याने त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.

दरम्यान, आरोपी बडे याला गावातील ग्रामस्थांनी चोप देऊन बांधून ठेवले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मारहाण झाल्याने आरोपी सुभाष बडे जखमी झाल्याचे समजते. घटस्फोटित पत्नीने दुसरा विवाह केल्याच्या रागातून बडे गाने तिच्यावरच गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असावा मात्र ती गोजी केदार यांना लागली, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वन विभाग संभ्रमात; बिबट्याचा हल्ला आणि उंची यांचा काही संबंध असतो का?

नाशिक । नगर सहयाद्री:- बिबट्याचा वावर असलेल्या शहराजवळील लोहशिंगवे येथे शुक्रवारी सकाळी ३० वर्षाच्या...

दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्यांचे महत्त्व अनमोल: आ. काशिनाथ दाते

२० लाख रुपयांचा पाडळी-कान्हुर रस्त्याचे भूमिपूजन पारनेर । नगर सहयाद्री:- रस्ते फक्त प्रवासाचे साधन नसून...

नातेवाईकाचं भयंकर कृत्य! १४ वर्षीय मुलीला रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं पुढे…

Crime News: एक धक्कदायक बातमी उजेडात आली आहे. घरी आलेल्या नातेवाइकाने १४ वर्षाच्या अल्पवयीन...

ब्रेकिंग न्यूज : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे!

मुंबई | नगर सहयाद्री:- राज्यात सध्या गुलाबी थंडीचा अनुभव येत असला, तरी बंगालच्या उपसागरात...