spot_img
अहमदनगरAhmednagar: संक्रांतीच्या दिवशी घडलं असं काही..; नगरमध्ये चॉपरने सपासप वार, एक ठार!

Ahmednagar: संक्रांतीच्या दिवशी घडलं असं काही..; नगरमध्ये चॉपरने सपासप वार, एक ठार!

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
भावाला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून एका युवकाने दुसर्‍या युवकावर चॉपरने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना एमआयडीसीतील दूध डेअरी चौकात मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळी घडली. शुभम अशोक सोनवणे (वय २४ रा. नवनागापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे.

बंटी ऊर्फ किरण प्रकाश पाटोळे (रा. दूध डेअरी चौक) याचा भाऊ रोहित पाटोळे सोमवारी सायंकाळी एमआयडीसीतील दूध डेअरी चौकात गेला होता. तेथे असलेल्या शुभम सोनवणे सोबत त्याचे वाद झाले. याची माहिती रोहितने बंटी पाटोळे याला दिली. बंटी याने चॉपर सोबत घेत दूध डेअरी चौक गाठला. रोहित सोबत वाद घालून त्याला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून बंटी याने शुभम सोनवणे यांच्यावर चॉपरने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.

जखमी शुभम सोनवणे यांना स्थानिकांनी विळद घाटातील रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉटरांनी मृत घोषित केले. मारहाण करणारा बंटी पाटोळे देखील जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक संपत भोसले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी रूग्णालयात धाव घेतली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...