spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय . दक्षिण भारतात केरळ आणि तमिळनाडू राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे .तर उत्तर मध्य भारतात हवेतील गारवा चांगलाच वाढतोय . राज्यात आता कडाक्याचा थंडीला सुरुवात झाली आहे . तापमानाचा पारा झपझप खाली येताना दिसतोय . हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फदृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्रात सह मराठवाडा विदर्भात तापमान घसरले आहे . प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार दिवस किमान तापमान कमालीचे घसरणार आहे . बहुतांश ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवेल.

पावसाचे चार महिने संपल्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता . परतीच्या पावसाला झालेला विलंब, अतिवृष्टी, पूर परिस्थिती या सगळ्या घडामोडींमुळे यंदा हिवाळा थोडा उशिरा सुरू झाला आहे .

विदर्भ गारठला, मराठवाड्यात काय स्थिती?
गेल्या तीन ते चार दिवसांपासून विदर्भात किमान तापमानाचा पारा वेगाने घसरत आहे . गेल्या 24 तासात 2 ते 3 अंशांनी तापमान घसरले असून गोंदिया जिल्ह्यात 10.5 अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे . जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून 9.2 अंश सेल्सियसवर पारा गेलाय . मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी 15 अंशाखाली गेलाय . आज कुठे किती तापमान होतं पाहूया .

अहमदनगर – 11.4°C

छत्रपती संभाजीनगर – 12.4°C

बीड – 11.4°C

दहानू – 17.4°C

हरनाई – 21.6°C

जळगाव – 9.2°C

जिऊर (जिउर/जुर) – 10.5°C

कोल्हापूर – 16.9°C

महाबळेश्वर – 12.5°C

मालेगाव – 11.2°C

मुंबई (सांताक्रूझ) – 19.8°C

नाशिक – 10.7°C

धाराशिव – 14.0°C

परभणी – 13.5°C

रत्नागिरी – 18.4°C

सांगली – 15.1°C

सातारा – 13.5°C

सोलापूर – 16.4°C

उदगीर – 14.0°C

महाराष्ट्रात किमान तापमान का घटलंय?
उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत लहरींमुळे येत्या शुक्रवार पर्यंत किमान तापमानाचा पारा खाली राहण्याची शक्यता असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितलं.
– हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फदृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई सोबत लगतच्या परिसरात तापमान कमी झाले आहे.
– दुसरीकडे मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली ,उत्तर प्रदेश या भागात थंडीची लाट राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...

दिल्लीगेट परिसरात राडा; दुचाकी फोडल्या, तरुणांना घेरलं, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पूर्वीच्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दिल्लीगेट परिसरात राडा घातल्याची...