spot_img
अहमदनगरAhmednagar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी नगर जिल्ह्यात! अजय-अतुल यांची मैफिल, 'यांचा' अभीष्टचिंतन...

Ahmednagar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी नगर जिल्ह्यात! अजय-अतुल यांची मैफिल, ‘यांचा’ अभीष्टचिंतन सोहळा

spot_img

श्रीरामपूर।नगर सहयाद्री-
उद्या गुरुवार दि. ४ जानेवारी रोजी श्रीरामपूर येथील थत्ते मैदान येथे शिडीं लोकसभा मतदारसंघाचेखासदार सदाशिव लोखंडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा निम्मित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती अभीष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने देण्यात आली आहे.

यावेळी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या कार्यक्रम ठेवण्यात आला असून मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, खासदार श्रीकांत शिंदे माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. भानुदास मुरकुटे, आ. आशुतोष काळे, आ. डॉ. किरण लहामटे, आ. सत्यजित तांबे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे, माजी आ. चंद्रशेखर कदम, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी आ. नरेंद्र घुले, माजी आ. वैभव पिचड, माजी आ. संभाजीराव फाटके आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री नारी शक्ती योजना नोंदणी शुभारंभ सकाळी ११.४५ वाजता होईल. त्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

सायंकाळी ६ ते ७ सत्कार समारंभ होणार आहे. खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री वयोश्री योजना व नारीशक्ती योजना शुभारंभ सायं. ७ वाजता होईल.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...