spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगेंच्या २० जानेवारीच्या अल्टिमेटमवर मुख्यंमत्री शिंदे व भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, पहा..

मनोज जरांगेंच्या २० जानेवारीच्या अल्टिमेटमवर मुख्यंमत्री शिंदे व भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, पहा..

spot_img

मुंबई /नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी पुढील आंदोलनाची आता २० जानेवारी तारीख ठरली आहे. २० जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. या वेळी सर्व मराठ्यांनी मला भेटायला या असे आवाहन केलं आहे. त्यामुळे सरकार आपल्याला कसे अडवेल? असा प्रश्नही त्याची विचारला आहे. त्यामुळे आता २० रोजी मराठा समाज आझाद मैदानात दाखल होईल. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या सभेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, आताच सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला असून क्युरेटिव्ह पिटीशन 24 जानेवारीला कोर्ट ऐकणार आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी मोठा दिलासा आता मिळालेला आहे.

24 जानेवारीला वकिलांची तज्ज्ञ फौज बाजू मांडेल, मराठा समाज मागास कसा आहे हे सांगेल, परिस्थिती सांगेल. सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मांडल्या होत्या, त्या दूर कऱण्याचं काम वकिलांची फौज करेल. मला वाटतं मराठा सामाजाला न्याय मिळेल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मागच्या सरकारने मविआ सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी जे पुरावे द्यायला हवे होते ते मांडले नव्हते. पण यावेळी निष्णात वकिलांची फौज बाजू मांडेल. तोपर्यंत सर्वांनी शांतता राखणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्थता, शांतता राहिली पाहिजे, सर्व जाती धर्मांना माझं आवाहन आहे, सर्वांनी संयम राखावा, मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल असे ते म्हणाले.

काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, कोर्टात मध्ये सध्या
क्युरेटिव्ह पिटीशन दाखल झाली आहे. त्यानुसार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळेल. आमची मागणीही तीच आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असे ते म्हणाले. तसेच त्यांनी यावेळीही जरांगे यांच्यावर टीका केली. तसेच जातीनिहाय जनगणना करा व त्यानुसार आरक्षण ठरवा अशीही मागणी त्यांनी केली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...