spot_img
अहमदनगरमुख्यमंत्री फडणवीस यांची अचानक आहिल्यानगर जिल्ह्याला भेट; कारण आलं समोर..

मुख्यमंत्री फडणवीस यांची अचानक आहिल्यानगर जिल्ह्याला भेट; कारण आलं समोर..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
दिलेला शब्द पाळत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यातील संवेदनशीलतेचा परिचय दिला. त्यांनी रविवारी कोपर्डी घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावली. नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या टाकळी हाजी या गावात रविवारी दुपारी हा साधा विवाह सोहळा झाला.

कोपर्डी (ता. कर्जत) येथील सुद्रिक कुटुंबातील मुलीचा विवाह निघोज (ता. पारनेर) येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला. सोयीचे ठिकाण म्हणून लग्न शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे पार पडले. सुद्रिक यांनी आपल्या धाकट्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण फडणवीस यांना पूर्वीच दिले होते. त्यांनी यायचे कबुल केले होते.

मधल्या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि कारभारही सुरू केला. मात्र, लग्नाला येतो, असा शब्द त्यांनी दिला होता. तो त्यांनी पाळला आणि लग्न समारंभाला फौजफाट्याह हजेरी लावत सर्वांना सुखद धक्का दिला.

यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. आपल्याला या विवाहाचे निमंत्रण होते, त्यामुळे येथे येऊन वधू-वरांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही कुटुंबाला आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“‘मत चोरी’तून सत्तेत आलेल्या सरकारची ‘जमीन चोरी’ ; राहुल गांधींचा मोदी, फडणवीसांवर निशाणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले...

पतीच्या अपहरणाचा कट; पोलिसांनी केला भांडाफोड, फिर्यादीच निघाला आरोपी..

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री ​भलत्याच व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा खोटा...

खळबळजनक! हत्येच्या कटात मुंडेंचा हात; मुंडे म्हणाले त्यांची आणि माझी

बीड / नगर सह्याद्री : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा...

नगरमध्ये तरुणाच्या घरासमोर तिघांचा पहाटे राडा, मोटारसायकलींची तोडफोड, काय घडलं पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ​"तो जर आम्हांला दिसला तर आम्ही त्याला जिवे ठार...