spot_img
अहमदनगरमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला निवडणुकीचा प्लान!, युती होणार नाही, त्या..

मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला निवडणुकीचा प्लान!, युती होणार नाही, त्या..

spot_img

Maharashtra politics: चार महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे कोर्टाने आदेश देताच राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीच्या रणनीतीवर भाष्य केलेय. ते पुण्यामध्ये बोलत होते. ज्या ठिकाणी युती होणार नाही, त्या ठिकाणी वेगळं लढू असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. महायुती म्हणूनच आम्ही निवडणुका लढवू. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. काही अपवादात्मक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असतील तर समजुतीने वेगळे लढू, पण युती होणार नाही, त्या ठिकाणी वेगळं लढू. एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महापालिका निवडणुका वेळेत घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.

ज्या भागात पावसाचा प्रभाव जास्त आहे, तिथे गरज भासल्यास १५ दिवसांची मुदतवाढ मागितली जाऊ शकते,असेही त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त ठिकाणी महायुती एकत्र लढेल. कार्यकर्त्यांची इच्छा स्वाभाविक आहे. ते वर्षानुवर्षे काम करतात, त्यांना संधी मिळावी असे वाटणे साहजिक आहे. आमच्या तिन्ही पक्षांना हेच वाटते. पण काही ठिकाणी युती शक्य नसल्यास निवडणुकीनंतर युती होऊ शकते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होतील, यावरही त्यांनी भर दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर! सरकार ऑगस्टचा हप्ता खटाखट जमा करणार, वाचा अपडेट..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक...

आजचे राशी भविष्य! अफाट धन-दौलत मिळणार! ‘या’ राशींच्या नशिबात राजयोग?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. तुमचे...

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...