spot_img
राजकारणमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा! महाराष्ट्राचे नवे मंत्री ठरले?, 'हे' बडे नेते शर्यतीत,...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा! महाराष्ट्राचे नवे मंत्री ठरले?, ‘हे’ बडे नेते शर्यतीत, वाचा यादी..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आता नवीन सरकार स्थापन करावे लागणार आहे. आज, २६ नोव्हेंबर रोजी सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. एकनाथ शिंदे यांनी सकाळी ११ वाजता राजभवानावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे.

पुढील विधेनसभेच्या मुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे. याशिवाय अनेक आमदारांनीही फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.

नव्या फॉर्म्युलानुसार एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सरकारमध्ये असतील. नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपचे सर्वाधिक मंत्री असणार असून अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समसमान मंत्रिपदं देण्यात येतील, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु झालं असून सध्या काही नावांची चर्चा आहे, मात्र त्यावर कुठलेही अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

भाजपमधून कुणाची नावं चर्चेत?
राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजी पाटील निलंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड अशा ११ जणांची नावं सध्या समोर आली आहेत.

शिवसेनेकडून कुणाची चर्चा?
शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची देखील समोर आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे या ११ जणांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीतून कोण चर्चेत?
अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांचीही यादी आली असून यात अजिते पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे या १३ जणांचा समावेश आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर दाखल; वाहतुकीत मोठा बदल, वाचा अपडेट

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या...

शहरातील लॉजवर प्रेमाचा भयंकर शेवट; बॉयफ्रेंडच्या कृर्त्याने शहर हादरलं

Crime News: एका लॉजवर महिलेची हत्या तिच्याच बॉयफ्रेंडने केली असल्याचे उघड झाले आहे. आरोपीने...

सावध राहा! भांडी स्वच्छ करण्याच्या नावाखाली सोनं पळवलं; नगर मधील धक्कादायक प्रकार ..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर मधील वसंत टेकडी, सावेडी येथे दोन अनोळखी इसमांनी एका 78...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा एका क्लिकवर..

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आर्थिक रूपात...