अहिल्यानगर । नगर सह्याद्री
भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार तथा अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील लिलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच प्रकृतीची विचारपूस केली.
आमदार कर्डिले यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या आजारावर शस्रक्रिया झाली आहे. आमदार कर्डीले आजारी असल्याचे समजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिलावती रुग्णातयात जाऊन आ. कर्डिले यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांशी संवाद साधला. लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आणि भाजपाच्या संघटनात्मक बांधणीत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे मोठे योगदान आहे.