spot_img
ब्रेकिंग'पुढच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री अजित पवार पांडुरंगाची शासकीय पूजा करतील'

‘पुढच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री अजित पवार पांडुरंगाची शासकीय पूजा करतील’

spot_img

अकोला / नगर सह्याद्री :
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. पुढच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सपत्नीक करावी, असं विठ्ठलाला साकडं घातल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील आरोग्यनगर भागातील निवासस्थानी रूपनाथ महाराजांची पालखी आली होती. यावेळी अमोल मिटकरी यांनी पालखीत रूपनाथ महाराज आणि विठ्ठलाकडे साकडं घालतांना अजितदादांना लवकरच राज्याचे मुख्यमंत्री करा, असे साकडे घातले. तसेच अमोल मिटकरी यांनी रूपनाथ महाराजांच्या पालखीचे सहपरिवार स्वागत केलं‌. त्यांनी त्यांच्या पत्नीसह पालखीत फुगडी देखील खेळली.

अमोल मिटकरी म्हणाले की, मी पांडुरंगाच्या चरणी एकदाच साकडे घातले होते. आज पालखीचे प्रस्थान होत आहे. ज्ञानोबारायांची पालखी आळंदीवरून निघाली आहे. काल तुकोबारायांची पालखी निघाली. आता आमच्या जिल्ह्यातील पालखी निघत आहेत. या पालखीची आरती करताना आम्ही एकच साकडे घातले की, यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी, हे साकडे मी पांडुरंगाला घातले आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, मिटकरींच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील वर्षी देखील अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा बोलून दाखवली होती. अमोल मिकटरी म्हणाले होते की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामध्ये महिलांसाठी ई -पिंक रिक्षा योजना आहे. मोफत शिक्षणाची सुविधा आहे. शेतकऱ्यांना मोफत विजबील आहे आणि सर्वात महत्वाची लाडकी बहिण योजना राबवण्यात आली आहे. याच योजनेच्या भरोशावर 2024 ची विधानसभा निवडणूक जिंकून अजितदादा पुढच्यावर्षी मुख्यमंत्री होतील आणि बाप्पाची पूजा करतील, असे त्यांनी म्हटले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुंबई हायअलर्टवर! गणपती विसर्जनाआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी ; ३४ मानवी बॉम्ब अन आरडीएक्स…

मुंबई / नगर सह्याद्री - मुंबईमध्ये गणपती विसर्जनादरम्यान आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात...

‌’अजित पवार चोरांचे सरदार‌’; कोणी केला आरोप?, वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सहयाद्री: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका पोलीस अधिकारी महिलेला फोनवरून तंबी...

शहरातील वाहतुकीत बदल, जड वाहनांना दिवसा प्रवेश बंद, वाचा पर्यायी मार्ग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील वाढत्या जड वाहन वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण...

सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 18 लाखांला फसवले; वाचा, अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रेल्वे खात्यात मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सेवानिवृत्त पशुसंवर्धन...