अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबरला रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. या भूमिपूजना संदर्भात बुऱ्हाणनगर येथे आमदार शिवाजीराव कडले यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
या बैठकीला भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, हमाल पंचायतीचे अविनाश घुले यांच्यासह संचालक, कर्मचारी, व्यापारी, मापाडी,ठेकेदार उपस्थित होते. आमदार कर्डिले म्हणाले या उपबाजार समितीचा नगरसह बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याना फायदा होणार आहे.
या कामाचे भूमिपूजन मंत्री जयकुमार रावल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या बाजार समितीमुळे आहिल्यानगरच्या विकासात भर पडणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह जिल्ह्यातील अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.