spot_img
ब्रेकिंगछगन भुजबळ अन मनोज जरांगे यांच्यात पुन्हा जुंपली…! दोघांमध्ये वार पलटवार सुरु…

छगन भुजबळ अन मनोज जरांगे यांच्यात पुन्हा जुंपली…! दोघांमध्ये वार पलटवार सुरु…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा होती. अखेर आज ही चर्चा खरी ठरली असून, भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यावरुन, आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहेत.

छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील सहभागवारुन मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लक्ष्य केलं होत. त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी पलटवार करत मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘ह्या जरांगेनेच एवढ्या मोठ्या चुका अन् खेळ्या केल्या आहेत. मनोज जरांगे यानेच सगळ्यात जास्त मराठा समाजाचे नुकसान केलं आहे, त्याच्यामुळेच गावागावात वाद लागले आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

तसेच, खरंतर मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून महाराष्ट्रात राहतो, पण ह्या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच निश्चितपणे मराठा समाजालाच त्रास झाला आहे, असंही छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

काय म्हणाले होते मनोज जरांगे?
मनोज जरांगे म्हणाले होते की, छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत, असं म्हणत मनोज जरांगे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

छगन भुजबळांना तात्पुरतं नादवलं असेल
पुढे बोलताना म्हणाले, अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल. जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे, त्याला मंत्रिपद दिलं जात आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने छगन भुजबळांना तात्पुरता आनंद दिला असेल. छगन भुजबळांला तात्पुरता नादी लावलं असेल, चॉकलेट दिलं असेल. छगन भुजबळांच्या आनंदावर शंभर टक्के विर्जन पडेल, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालेसफाई की गवतसफाई?; माजी नगरसेवक निखिल वारे यांचा संतप्त सवाल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेकडून पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाईची...

दिलासादायक! आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश, ‘ती’ योजना अखेर जाहीर

संगमनेर | नगर सह्याद्री राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात अनेक वर्षांपासून थकीत मालमत्ता करामुळे...

आत्मचिंतन करा! सभापती शिंदे यांचा आमदार पवार यांना टोला

कर्जत | नगर सह्याद्री:- कर्जत नगरपंचायतीमध्ये बंडखोर गटनेते संतोष मेहत्रे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध करण्यात आली...

आयुक्त यशवंत डांगे यांचे ठेकेदाराला आदेश; ‘ते’ काम 31 मे पूर्वी पूर्ण करा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात माळीवाडा ते माणिक चौक ते भिंगारवाला चौक, तसेच अमरधाम ते...