श्रीगोंदा / नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यात देऊळगाव येथील फॉरेस्ट लगत मुख्यवितरिका डी वाय बारा चारी बुधवारी दि. १जानेवारी २०२५ रोजी रात्री दहाच्या सुमारास चारी फुटली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुकडी इरिकेशन संबंधित पाणी सोडणारा पाठकरी यांनी चारीची पाहणी न करता , रात्री दहाच्या सुमारास अचानक पाणी सोडल्याने डी वाय बारा चारीला घळ पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.
डी वाय बारा चारीचे ठिकठिकाणी फुटलेली असून या चारीचे तत्काळ अस्तरीकरण आणि दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
डी वाय बारा चारी ची माती पाण्याने वाहून जाऊ लागली असून ही चारी तीन दिवसांपूर्वी देऊळगाव जंगला शेजारी फुटून बाजूला असलेल्या जंगलामध्ये पाणी साचले आहे.
पाटबंधारे विभागाने भविष्यात इतर ठिकाणी ही चारी फुटू नये, यासाठी या संपूर्ण चारीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.तसेच ही चारी ज्या ठिकाणाहून सुरू झाली त्या ठिकाणापासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे.
या चारीचा प्रवाह देऊळगाव, तांदळी , घुगलवडगाव, आढळगाव, घोडेगाव, भिंगान या गावांतील शेतकऱ्यांना या चारीचा लाभ होत असतो परंतु चारी फुटल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले दिसत आहेत.
चारी फुटल्यामुळे तसेच पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच लवकरात लवकर चारी दुरुस्त करून पाणी सोडण्याची मागणी करत आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ व तेथील शेतकरी म्हणाले की, चारीची पाहणी न करता आहिरे यांनी पाणी सोडले. आगामी काळात शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास आहिरे यांच्या वरती तक्रार करणार व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
आहिरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की , जंगलाच्या दिशेने सायाळाने होल पाडले असता चारी फुटल्या गेली. व फुटलेली चारी दुरुस्त करून लवकरात लवकर पाणी सोडण्यात येईल असे आहिरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.