spot_img
अहमदनगरविधानपरिषद निवडणुकीतही चुरस; कोण ठरणार किंग मेकर? पहा..

विधानपरिषद निवडणुकीतही चुरस; कोण ठरणार किंग मेकर? पहा..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे कोणता एक उमेदवार पडणार हे निश्चित आहे. आता गुप्त मतदान असल्याने कोणाची मते फुटणार?. यावरुन तर्कवितर्क सुरु झाले आहेत. भाजपकडे स्वत:चे १०३ आणि अपक्ष आणि इतर पकडून १११ आमदार आहेत. त्यामुळे २३ मतांच्या कोट्यानुसार भाजपचे ४ आमदार सहज निवडून येणार आहेत. पण ५व्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपला ४ मतांची गरज आहे.

शिंदेंच्या शिवसेनेकडे स्वत:चे ३७ आणि अपक्ष ६ असे ४३ आमदार आहेत. शिंदेंचे २ उमेदवार आहेत. दुसर्‍या उमेदवारासाठी शिंदेंना ३ मतांची गरज आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही २ उमेदवार दिले आहेत. दादांकडे ४० आणि इतर ३ असे एकूण ४३ आमदार आहेत. त्यांना देखील दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी ३ मतांची आवश्यकता आहे.

महाविकासआघाडीबाबत बोलायचे झाले तर काँग्रेसकडे ३७ आमदार असल्याने प्रज्ञा सातव या सहज निवडून येतील. ठाकरेंच्या शिवसेनेकडे स्वत:चे १५ आणि अपक्ष शंकरराव गडाख असे एकूण १६ आमदार आहेत. म्हणजेच त्यांना ७ मतांची गरज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शेकापच्या जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला. पवारांच्या राष्ट्रवादीकडे १२ आमदार आहेत. म्हणजेच जयंत पाटलांना विजयासाठी १३ मते हवी आहेत.

आता गेम चेंजर आहेत ते छोटे पक्ष आणि याच छोट्या पक्षांकडे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्या नजरा आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार आहेत. बच्चू कडू यांच्या प्रहारचे २ आमदार आहेत. समाजवादी पार्टीकडे २ आमदार आहेत आणि एमआयएमचे २ आमदार आहेत. तर मनसेचा १ आमदार आहे, त्यामुळं हे छोटे पक्ष गेम बदलवू शकतात.

बच्चू कडूंनी तर परफेट कार्यक्रम करणार असल्याचे सांगत गेम खेळणार असल्याचे सांगितले. गुप्त मतदान होणार असल्याने मते फुटण्याची शयता दाट आहे. त्यातच अजित पवार गटाचे आमदार पुन्हा परतणार असल्याचे दावे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरु झालेत.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे उमेदवार आहेत. मात्र आमच्याकडे मतांचा कोटा असल्याचे मिटकरींचे म्हणणंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी ७ मते आणि शिंदेंच्या शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी ३ मतांची गरज आहे. मात्र राऊतांनी मविआच्या तिन्ही उमेदवारांच्या विजयाचा दावा केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...