spot_img
महाराष्ट्रलाडकी बहीण योजनेत बदल, ‘या’ महिलांना मिळणार फक्त ५०० रुपये?

लाडकी बहीण योजनेत बदल, ‘या’ महिलांना मिळणार फक्त ५०० रुपये?

spot_img

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय घेतला गेला असून सुमारे ८ लाख महिलांना यापुढे १५०० ऐवजी फक्त ५०० रुपये मिळणार आहेत. ही योजना सुरुवातीपासूनच महिलांसाठी आर्थिक मदतीचा आधार होती. मात्र, नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना ही रक्कम कमी करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या महिलांना दोन्ही योजनांचा पूर्ण लाभ देता येत नसल्याने शासनाच्या पूर्वीच्या निर्णयानुसारच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे कुठलाही नवीन घोळ किंवा गोंधळ झालेला नाही.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये मिळण्याचे निकष ठरवताना शासनाने २८ जून आणि ३ जुलै २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयांनुसार, इतर कोणतीही सरकारी योजना न घेतलेल्या महिलांनाच पूर्ण १५०० रुपये दिले जातात. पण ज्या महिलांना इतर योजनांचा काही हिस्सा मिळतो, त्यांना फक्त फरकाची रक्कम म्हणजे ५०० रुपये दिले जात आहेत. त्याचप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहिना १००० रुपये लाभ घेणाऱ्या सुमारे ७.७ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून उर्वरित फक्त ५०० रुपयांचाच सन्मान निधी मिळणार आहे. यामध्ये एकाही पात्र महिलेला योजना बंद करण्यात आलेली नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

योजनेबाबत विरोधकांकडून सातत्याने अपप्रचार करण्यात येतो आहे, असे म्हणत अदिती तटकरे यांनी या मुद्यावर सरकारची बाजू मांडली. त्यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले असून त्याची नोंदही घेतलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या भगिनींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही तटकरे यांनी म्हटले. या योजनेंतर्गत महिलांना दरमहिना स्थिर सन्मान निधी देण्याचा उद्देश कायम ठेवण्यात आलेला असून शासन धोरणात कोणताही गोंधळ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...