spot_img
अहमदनगरनगर-पुणे महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल; असा असेल वाहतूक बदल

नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल; असा असेल वाहतूक बदल

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
हवेली तालुक्यातील मौजे पेरणे फाटा येथे एक जानेवारी २०२२ रोजी जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजल्यापासून ते दोन जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ०६ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांना सोडण्यात येणार आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे.

1 जानेवारी रोजी जयस्तंभ कार्यक्रम होणार असून यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार आहे. हा कार्यक्रमनगर-पुणे महामार्गालगत असून कार्यक्रमाकरिता येणार्‍या नागरीकांमुळे या महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून वाहनाच्या कार्यक्रमाकरिता आलेल्या भाविकांना धक्का लागून, अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता नगर- पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक तसेच अहिल्यानगरकडून सरळ पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहतूक मार्गामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्याचे नियोजित केले आहे.

असा असेल वाहतूक बदल
बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणार्‍या वाहतुकीसाठी मार्ग- बेलवंडी फाटा, देव दैठण, धावलगाव, पिंपरी कोळंडर, उक्कडगाव, बेलवंडी, नगर- दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ, मढे वडगाव, काष्टी, दौंड, सोलापूर, पुणे महामार्गे पुणेकडे. नगर कडून सरळ पुण्याकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग कायनेटीक चौक/केडगाव बायपास, अरणगाव बायपास, कोळगाव, लोणी व्यंकनाथ, मढे वडगाव, काष्टी, दौंड, सोलापूर, पुणे महामार्गे पुणे कडे. नगरकडून पुणे मार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाणे कडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग कल्याण बायपास, आळेफाटा, ओतूर, माळशेज, घाट मार्ग असा राहील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संदीपदादा कोतकर विचार मंच महापालिकेसाठी ऍक्टिव्ह! ‘ते’ अभियान राबवत निवडणुकीची तयारी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ मध्ये होतील असे...

देवेंद्रजी, लाडक्या बहिणी अन्‌‍ त्यांच्या लेकीबाळी राज्यात असुरक्षित झाल्यात!

सारिपाट | शिवाजी शिर्के:- लोकसभा अन्‌‍ त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसत असताना आणि...

कृतनिश्चयी प्रधानसेवक!

Former Prime Minister Manmohan Singh : साधारण 2012 पासून, त्या वेळी पंतप्रधान पदावर असलेले...

बीडच्या घटनेची पुनरावृत्ती! सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रकार

Maharashtra Crime News: मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्यातलं राजकारण तापलं...