spot_img
अहमदनगरचांदणी चौकातील बंद सिग्नलला चपलांचा हार, शिवसेना आक्रमक

चांदणी चौकातील बंद सिग्नलला चपलांचा हार, शिवसेना आक्रमक

spot_img

नगर सह्याद्री / अहमदनगर : नगर शहरातील उड्डाणपुलाखालून शहरांतर्गत वाहतूक सुरु आहे. परंतु अपुरी पोलीस यंत्रणा व सिग्नलचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उड्डाणपुलाखालील संभाव्य अपघात टाळण्यासाठी चांदणी चौक, बाहयवळण व नगर मधील विविध ठिकाणची बंद सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी किंवा वाहतूक नियंत्रक पोलीस नेमावा अशी मागणी शिवसेनेनं केली.

यासाठी आज शिवसेनेने चांदणी चौकातील बंद सिग्नलला चप्पलाचा हार घालत आंदोलन केले. यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, संतोष गेन्नप्पा, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, स्मिता अष्टेकर, नगरसेवक योगिराज गाडे, जालिंदर वाघ, दादा भोसले, दीपक भोसले आदींसह आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

भगवान फुलसौंदर म्हणाले कायनेटिक चौक, यश पॅलेस, स्वस्तिक व चांदणी चौक, कोठी चौक, चाणक्य चौक, स्टेट बँक चौक, कोठला स्टॅन्ड, माळीवाडा बस स्टँड, स्वीट होम चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती चौक, नगर कल्याण रोड बायपास चौक, भिस्तबाग, हुंडेकरी, गुलमोहार रोड आदी ठिकाणी सिग्नलची अवस्था असून खोळंबा नसून अडचण अशी झाली आहे.

संभाजी कदम म्हणाले की, वारंवार निवेदन देऊनही प्रशासन यावर काहीच कारवाई करत नाही. सातत्याने होणार अपघात, वाहतूक कोंडी थांबायला हवी याकरता हे आंदोलन करत आहोत.

विक्रम राठोड म्हणाले शिवसेना ही नेहमी जनतेच्या प्रश्नांकरता रस्त्यावर उतरते. अनेक ठिकाणी सिग्नल बंद असून प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे. उडडाणपुलाखालून वाहतूक जास्त असून सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...