पारनेर | नगर सह्याद्री
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा गडावर चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी सदानंदाचा येळकोट करीत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
चंपाषष्ठी उत्सवानिमित्त पहाटे चार वाजता खंडोबा मंगलस्नान पार पडल्यानंतर चांदीची सिंहासन पेटी व चांदीच्या उत्सव मूतचे सिंहासनावर अनावरण झाले. उत्सव मूतना साज शृंगारसह पुजा व महाआरती संपन्न झाली. दिपक लंके, जया लंके व अन्नदाते यांच्या हस्ते अभिषेक, पुजा व आरती पार पडली. गोरेगाव येथून आलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे ट्रस्ट मार्फत स्वागत करण्यात आले. दुपारी बारा वाजता अमरावती येथील पद्माकर देशमुख महाराज यांचा किर्तन सोहळा पार पडला.
यावेळी परीसरातील भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते. दुपारी एक वाजता चांदीची पालखी व चांदीच्या उत्सव मूत यांची नविन शाही रथातुन मंदीर प्रदिक्षिणा मिरवणूक काढण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर, अध्यक्ष शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, अशोक घुले, विश्वस्त ॲड. पांडुरंग गायकवाड, तुकाराम जगताप, राजेंद्र चौधरी, चंद्रभान ठुबे, अभयसिंह नांगरे, जालिंदर खोसे, कमलेश घुले, सुवर्णा घाडगे, अजित महांडुळे, रामचंद्र मुळे, धोंडीभाऊ जगताप, सुरेश फापाळे, दिलीप घुले, महादेव पुंडे उपस्थित होते. यावेळी बारा वाजल्यापासून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी दोन वाजता शाहीर विलास अटक व शाहीर नामदेव शिंदे यांचे खंडोबाची गाणे स्पर्धा झाली यावेळी नागरीकांनी या गाण्यांना रोखीने बक्षिसे दिली.