spot_img
अहमदनगरसभापती राम शिंदेंची सदस्य नोंदणी अभियानात बाजी! किती लोकांना भाजप पक्षाशी जोडलं?

सभापती राम शिंदेंची सदस्य नोंदणी अभियानात बाजी! किती लोकांना भाजप पक्षाशी जोडलं?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- 
भाजपने संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी अभियान सुरू केले असून, या अभियानात पक्षाचे नेते आणि विधान परिषदचे सभापती राम शिंदे यांनी मोठा वाटा उचलला आहे. त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून तब्बल १००० नवीन सदस्यांची नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. भाजपच्या विचारधारेचा अधिकाधिक नागरिकांना भाग बनवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

राम शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्टपणे सांगितले की, भाजप हा केवळ एक पक्ष नाही, तर तो राष्ट्र उभारणीचा एक संकल्प आहे. अधिकाधिक नागरिकांना या विचारधारेचा भाग बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने कार्य केले पाहिजे.” त्यांच्या या वक्तव्यावरून पक्षविस्तारासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार दिसून येतो. नव्या सदस्यांनी भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नवीन सदस्य नोंदणी पूर्ण केल्यानंतर राम शिंदे यांनी भाजप परिवारात सामील झालेल्या सर्व नव्या सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. या अभियानामुळे पक्ष संघटनेची ताकद वाढेल आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवर याचा प्रभाव पडू शकतो. राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांनीही या सदस्य नोंदणी अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.

अभियानामुळे पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळणार
राम शिंदे हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले असून, मागील निवडणुकीत त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. मात्र, पक्षाने त्यांच्या योगदानाची दखल घेत विधान परिषदेचे सभापती म्हणून त्यांची निवड केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, पक्षासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत. दरम्यान, भाजपच्या या सदस्य नोंदणी अभियानामुळे पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असे मानले जात आहे. पक्षातील नव्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढल्यास आगामी निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...