कोल्हापुर। नगर सहयाद्री-
कोल्हापुरात एक खळबळजनक प्रकार घडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. मुलीचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी केलेल्या अजब प्रकारची जोरदार चर्चा सुरु आहे. याप्रकरणी प्रियकराच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापुरातील एका गावात राहणाऱ्या एका तरुणांचे गावातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधाची कुणकुण मुलींच्या कटूंबाला लागली होती. अनेकदा मुलीला समजावले तरी मुलगी काय ऐकेना. कटूंबाचा त्याच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यामुळे आपल्या मुलीचे लग्न त्या तरुणांशी होऊ नये म्हणून कटूंबीयांनी अजबच मार्ग पत्करला.
मुलीच्या कुटुंबियांनी एका भोंदूबाबाच्या मदतीने २९ सप्टेंबरच्या रात्री गावातील स्मशानभूमीत एक प्रयोग केला. यांची कुणकुण तरुणाला लागताच त्याने स्मशानभूमीत धाव घेतली. समोरचे दृश्य पहाताच तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली.टाचण्या लिंबू तरुणाचा फोटो व मुलीचा फोटो, अंडे दारू ठेवल्याचे आढळून आले. याप्रकरणी तरुणाने पोलिसात फिर्याद दिली असून भोंदूबाबासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.