मुंबई / नगर सह्याद्री –
राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात राज्यात सीबीएस पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. राज्यातली मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांनी स्पर्धा परीक्षेत मुलांची तयारी व्हावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. येत्या १ एप्रिलपासून सीबीएसी पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. पण या नव्या शैक्षिणक अभ्यासक्रमामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रमाचा काय फायदा होऊ शकतो, आदी विषयाबाबत सविस्तव माहिती जाणून घेऊयात….
महाराष्ट्रात CBSE पॅटर्न
महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी 20 मार्च 2025 रोजी केली होती. हा बदल टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. या नव्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीसाठी CBSE पॅटर्न लागू होईल. अभ्यासक्रम हा NCERT (National Council of Educational Research and Training) च्या धर्तीवर तयार केला जाणार आहे. त्यानंतरच्या वर्षांत हळूहळू इयत्ता दुसरी, तिसरी आणि पुढील वर्गांसाठी हा पॅटर्न लागू होईल. पाच वर्षांत संपूर्ण राज्यात CBSE पॅटर्न पूर्णपणे राबवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून…
CBSE पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना JEE, NEET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करणे सोपे जाईल. हा निर्णय महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत क्रांतीकारी बदल घडवू शकतो, परंतु त्याची यशस्वी अंमलबजावणी नियोजन, समन्वय आणि सर्वांच्या सहभागावर अवलंबून असेल. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून पालक आपल्या मुलांना सीबीएसी बॅार्डाच्या शाळेत शिक्षणासाठी पाठवतात. यामुळे राज्य शैक्षणिक महामंडळातील मुले मागे पडू नयेत, म्हणून सीबीएसचा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक मंडळाच्या शाळांमध्ये राबविला जाणार आहे.
मराठीला प्राधान्य
या अभ्यासक्रमात मराठी, इतिहास., भूगोल या विषयांना प्राध्यान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सीबीएसी अभ्यासक्रमाची पुस्तके देखील मराठीत तयार केली जातील, असे देखील सांगण्यात आले आहे. प्रत्येक शाळेला मराठी विषय बंधनकारण असणार आहे. येणाऱ्या वर्षीपासून सीबीएसी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी देखील केली जात आहे. पहिला टप्पा पहिलीचा वर्गासाठी राबिवण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी दोन टप्प्यात म्हणजेच दुसरी, तिसरी चौथीसाठी हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे हा यामागाचा सरकारचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे.
फी वाढणार नाही
या नव्या अभ्यासक्रमामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनमध्ये संभ्रवस्था आहे, यामुळे फी तर वाढवली जाणार नाही ना असा प्रश्न केला जात आहे. पण खुद्द शिक्षण मंत्र्यांनीच कोणत्याही प्रकारची फी वाढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमातून शाळेत मुलांना दाखल करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, परिणामी राज्य शैक्षणिक महामंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेला असलेला सीबीएसी पॅटर्न राज्य शैक्षणिक बोर्डाच्या शाळांमध्ये शिकवला जाणार असल्याचे पटसंख्या वाढली जाणार असल्याची शक्यता आहे.
शिक्षक भरतीच काय झालं?
राज्यातील शाळांमध्ये शिक्षक भरती रखडेली आहे. या विषयी सरकारने काय करणार आहे याची स्पष्टता नाही. यामुळे शिक्षकांची भरती न करता थेट नव्या अभ्यासक्रम लागू करण्याची भूमिका अणाठायी असल्याचे बोलले जात आहे. तसेच या नव्या अभ्यासक्रम शिक्षकवण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षणाचे कसे घेतले जाणार आहे. याविषयी देखील स्पष्टता नाही. शिक्षक भरती कागदावरच आहे.
विद्यार्थ्यांवर बर्डन येवू नये
या नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे वाढणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना याविषी बर्डन येऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात याविषयीची भीती काढूण टाकण्यासाठी सरकार कोणती पाऊल उचलत आहे, याबद्दलही स्पष्टता नाही. विद्यार्थ्याच्या वेळापत्रकात बदल होणार असल्याने त्यांच्या सुट्ट्या कमी होणार असल्याचे पालक बोलत आहेत.