spot_img
अहमदनगरसावधान! अहिल्यानगरला पावसाचा यलो अलर्ट, कुठे पडणार पाऊस

सावधान! अहिल्यानगरला पावसाचा यलो अलर्ट, कुठे पडणार पाऊस

spot_img

राज्यात विजांसह पावसाचा अंदाज
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पावसाळ्यापूर्वीच्या कामांना गती देण्यास संधी मिळाली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळीने राज्यभरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाने राज्यातील विविध भागांत पावसाचा अंदाज वर्तवविला आहे. त्यात अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा यासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला असून, यलो अलर्ट जारी केला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजासंह वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलया पावसाची शयता वर्तविण्यात आली आहे. तर १० जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय कमाल तापमानामध्ये देखील चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जिल्ह्यात ४ ते ७ जून दरम्यान पाऊस ; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जिल्‍ह्याच्या काही भागात दि. ४ ते ७ जून या कालावधीत वीजांच्या कडकडाटासह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊसा आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे. जिल्‍ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्‍यात आलेला आहे. नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत / दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणाऱ्या किंवा लोंबकळणाऱ्या केबल्‍स पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्‍ज्) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्‍यासाठी दक्षतेची बाब म्‍हणून जाहिरात फलकांच्‍या (होर्डिंग्‍ज) आजूबाजूला थांबू नये व योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. धरण व नदीक्षेत्रामध्‍ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. धरणाचे पाण्‍यात वा नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी (Selfie) काढू नये. वादळी वारा, पाऊस व गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्‍यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी.जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे. वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन किंवा जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्‍वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पुढील ४८ तासांत जोरदार पावसाची शयता
देशातील अनेक भागात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील दोन दिवसांत ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पावसाची तीव्रता देखील कमी होऊ शकते, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुढील चोवीस तासांत ठेवीदारांचे पैसे द्या, आम्ही पाठिंबा द्यायला तयार!

गोरेश्वर सहकार बचाव पॅनलचे प्रमुख बाबासाहेब तांबे यांचा विरोधकांवर हल्लाबोल पारनेर | नगर सह्याद्री पतसंस्था...

जीममध्ये भयंकर घटना! तरुणाला फरशीवर आपटले, कारण काय?

जामखेड । नगर सहयाद्री:- जीममध्ये तु उशिरा का आलास असे म्हणत एकास जीममध्येच उचलुन...

‘जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची हिवरेबाजारला भेट’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिवरेबाजार येथे गुरुवार 05 जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ‌‘एक...

पारनेरकरांना खुशखबर! आमदार दाते यांच्या पाठपुराव्याला यश; या कामांसाठी 20 कोटी…

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मांडओहोळ धरणाच्या डावा कालवा दुरुस्ती, अस्तरीकरण...