अहमदनगर । नगर सहयाद्री:-
मापारवाडी शिवारातून १० लाखांचे डाळींब चोरी कारणार्या तीन आरोपींना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने जेरबंद केले. तर अन्य पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.
राहाता येथील मापारवाडी शिवारातील शेतकर्यांच्या शेतातील १० लाखांचे डाळींब चोरून नेल्याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला. या गुन्ह्यातील आरोपी हे राहुरी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आदीनाथ गोविंद माळी, अमोल नामदेव पवार, आनंद संजय पवार यांना पकडले. तर अन्य पसार असलेल्या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनोश आहेर यांनी ही माहिती दिली.