आहिलयनगर । नगर सहयाद्री:-
येथील गांधी मैदानावर अवैधरित्या तलवार घेऊन आलेल्या तरुणाला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याविरूध्द आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जॉन कासीनो परेरा (वय ३६ रा. बंगाल चौकी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
एक तरुण हा शहरातील गांधी मैदानावर अवैधरित्या तलवार घेऊन येणार आहे, अशी माहिती होती पोलीस अधीकारी अमोल भारती यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन बातमीतील नमुद तरुणाला सापळा लावून शिताफीने पकडले. त्याने त्याचे नाव जॉन कासीनो परेरा असे सांगितले. त्याच्या कब्जात एक तलवार मिळून आली आहे. पोलिसांनी ती जप्त केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधीकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोनि प्रताप दराडे, व गुन्हे शोध पथकाचे सपोनि योगिता कोकाटे, पोहेकों मंदीप पितळे, पोहेकों विशाल दळवी, पोकों दिपक रोहोकले, पोकों तानाजी पवार, पोकों सुरज कदम, पोकों अतुल काजळे, पोकों सचिन लोळगे, पोकों संकेत धीवर यांच्या पथकाने केली आहे.